Type Here to Get Search Results !

Maulana Abul Kalam Azad 'Education Day' Information मौलाना अबुल कलाम आज़ाद 'शिक्षा दिवस' की जानकारी

मौलाना अबुल कलाम आझाद ‘शिक्षण दिवस’ माहिती,Maulana Abul Kalam Azad 'Education Day' Information

 

मौलाना अबुल कलाम आझाद , (भारतरत्न पुरस्कार सन १९९२)


भाषण क्र . 1


अबुल कलाम आझाद यांचे मूळ नाव अबुल कलाम मोहनुद्दीन अहमद असं आहे. अबुल कलाम म्हणजेच ‘वाचस्पती’ ही पदवी त्यांना मिळाली होती. पुढे ते आझाद नाव लावू लागले. आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी मक्का येथे झाला. त्यांचे वडील भारतीय होते, तर आई अरब होती.
आझाद यांना लहानपणापासून वाचन, लेखनाची हौस होती. त्यांनी फारसी, उर्दू, अरबी भाषांचे ज्ञान मिळविले. तसेच तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान, गणित या विषयांचा अभ्यास केला. आझाद यांनी लोकजागृतीसाठी कोलकता येथे ‘अल हिलाल’ हे उर्दू साप्ताहिक सुरू केले; पण इंग्रज सरकारने त्यावर बंदी घातली. नंतर त्यांनी ‘अल बलाग’ हे दुसरं साप्ताहिक सुरू केले. मौलाना आझाद त्यांच्या लेखनातून ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनतेला जागृत करत. जनतेच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची जाणीव निर्माण करत. विशेषत: मुस्लिमांनी हिंदू समाजाच्या बरोबरीनं ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करावा, असं ते त्यांच्या लेखनातून, भाषणातून सांगत. आपल्या धर्माची तत्त्वं त्यांनी जपली. मात्र, खरा धर्म मानवता धर्म आहे, या मानवतावादी धर्माचे आचरण करावे, त्यातूनच समाजाची आणि देशाची सेवा करावी, ही गोष्ट मौलाना आझाद यांना गांधीजींकडून कळाली. ते गांधीजींचे अनुयायी बनले. पुढे काँग्रेसचे प्रमुख नेते झाले. वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. तेव्हा अध्यक्षीय भाषणात हिंदू-मुस्लिम ऐक्यावर त्यांनी भर दिला. ८ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिश सरकारला ‘भारत छोडो’चा इशारा देण्यात आला. तेव्हा प्रमुख काँग्रेस नेत्यांची धरपकड झाली. अर्थातच, मौलाना आझाद यांनाही अटक झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांचे शैक्षणिक धोरण धर्मनिरपेक्ष होते. आधुनिक शास्त्रे आणि आधुनिक विचार यांनाच त्यांच्या शैक्षणिक धोरणात प्राधान्य होते.
मौलाना आझाद एक प्रभावी वक्ते होते, तसेच उत्तम लेखकही होते. ‘तरजुमानुल कोरान’ हा त्यांनी केलेला कुराणाचा अनुवाद प्रसिद्ध आहे. ‘इंडिया विन्स फ्रिडम’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध करण्यात आले. मौलाना आझाद यांचे २३ फेब्रुवारी १९५८ रोजी निधन झाले.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भाषण क्र . 2


मौलाना अबुल कलाम आझाद जिवन परिचय .


‘इंग्रजांना मी सत्ताधारी मानीत नाही तर त्यांना विनंती का करू?’ हे उद्गार मौलाना आझाद यांना इंग्रजांनी अहमदनगर येथील तुरुंगात ठेवले होते त्या वेळी त्यांनी काढले. मौलाना आझाद यांच्या पत्नीचे निधन झाले होते. इंग्रजांनी त्यांना निरोप दिला की, पत्नीच्या दफनविधीसाठी आम्ही तुम्हाला सोडू; पण तुम्ही तसे विनंतीपत्र इंग्रज सरकारला द्या. त्या वेळी मौलाना आझाद यांनी इंग्रजांना असे बाणेदार उत्तर दिले. मौलाना आझाद यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी सौदी अरेबिया या देशातील पवित्र भूमी मक्का येथे झाला. त्यांचे वडील मौलाना खैरुद्दीन हे धर्मगुरू होते. ही भूमी मौलाना खैरुद्दीन यांना न मानवल्याने ते आपल्या कुटुंबासह भारतात आले आणि त्यांनी कोलकाता शहरात वास्तव्य केले. मौलाना आझाद यांच्या मातोश्री मक्का येथील धर्मगुरूंच्या कुटुंबातील होत्या. आई आणि वडील या दोघांकडील घराणे उच्चशिक्षित होते. मुलाची पावले पाळण्यात दिसतात या न्यायाने मौलाना आझाद लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. ते इस्लाम धर्माचे आधुनिक विचारवंत होते. आई आणि वडिलांची घराणी कट्टरपंथी असली तरी मौलाना आझाद कट्टरपंथी नव्हते. मौलाना आझाद यांनी इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणाचा अभ्यास करून त्यावर ‘तर्जुमानुल कुरान’ हे पुस्तकही लिहिले आहे.
मौलाना आझाद यांना अरबी, फारशी, इंग्रजी व उर्दू या भाषा चांगल्या अवगत होत्या व ते चारही भाषांतून लिखाण करीत असत. ते एक उत्कृष्ट वक्तेदेखील होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहत असत. ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होते. अनेक हिंदू विचारवंत त्यांचे चाहते होते. ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक निष्ठावान शिपाई होते. फारसा गाजावाजा न करता कार्य करीत राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला नसता तर त्यांनी गुरू-शिष्य परंपरेत म्हणजेच पीर मुरीदी परंपरेत खूप चांगले कार्य केले असते. त्यांच्या गळ्यात असणा-या स्वरगंगेत लोक वाहून जात असत. परंतु संगीत क्षेत्रातही न रमता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्रप्रसाद, अ‍ॅनी बेझंट, लालबहादूर शास्त्री, विठ्ठलभाई पटेल यांच्यासमवेत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी उडी घेतली. सुरुवातीला ते सर सय्यद यांच्या विचारांनी भारावलेले होते. परंतु सर सय्यद यांनी इंग्रजांशी मैत्री केल्यामुळे प्रखर राष्ट्रवादी असलेल्या मौलाना आझाद यांनी त्यांच्याशी नाते तोडले. भारत हा आपला देश आहे, त्यावर परकीयांचा ताबा ही दडपशाही आहे, अशी त्यांची भूमिका होती. भारतावर स्वकीयांचीच सत्ता हवी असे त्यांचे मत होते. कष्ट आणि निष्ठा यावर मौलानांची नितांत श्रद्धा होती व शेवटपर्यंत त्यांनी या विचारांवरच वाटचाल केली.
इंग्रजांनी 1857 मध्ये संपूर्ण भारतावर ताबा मिळवला. 1857 च्या लढाईत भाग घेणा-या मुस्लिम घराण्यांमधील लोकांची इंग्रजांनी कत्तल केली व त्यांच्यावर अत्याचार केले. काही जणांना काळ्या पाण्याची शिक्षाही दिली तर अनेकांना दिल्लीच्या रस्त्यावर फाशी दिली. यात मुसलमानांची संख्या अधिक होती. कारण इंग्रजांची अशी भूमिका होती की, मुसलमान हे या देशाचे राजे होते. त्या वेळी भारतीय मुसलमानांच्या मनात मोठ्या प्रमाणावर नैराश्य पसरले. पूर्वी ‘बाप, राजा’या भूमिकेत वावरणारे मुसलमान इंग्रजांनी सत्ता बळकावल्यामुळे दुखावले गेले होते. त्यानंतर 50-60 वर्षांपर्यंत कोणीही मुलसमान इंग्रजांसमोर येण्यास तयार नव्हते. सर सय्यद यांच्यासारखे बुद्धिवंत इंग्रजांशी मैत्री करून इंग्रजांच्या बाजूने बोलत असत. अशा वेळी मौलाना आझाद यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एका निष्ठावान राष्ट्रवादी मुसलमानाची भूमिका बजावली. मौलाना आझाद देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटत होते. महात्मा गांधींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी देशाचे विभाजन स्वीकारले, पण जे मुसलमान भारत सोडून पाकिस्तानला स्थलांतरित होत होते, त्यांना मौलाना आझादांनी विरोध केला होता. मौलाना हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सच्चे प्रतीक होते.
सन 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. पं. जवाहरलाल नेहरूंनी मौलानांकडे शिक्षण मंत्रालयाचे काम सोपवले व ते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री झाले. त्यांनी त्या काळी अत्यंत बिकट परिस्थितीतही भारतात शिक्षणाचा प्रसार व प्रचार उत्तम प्रकारे राबवला. मौलाना आझाद यांना युरोपच्या तत्कालीन समस्यांचे चांगले ज्ञान होते. जर्मन आणि इटलीच्या सत्ताधा-यांची दडपशाही संपूर्ण जगासाठी मोठा धोका ठरणार आहे, असे ते सांगत. हिटलरच्या काळात अल्पसंख्याक आणि बुद्धिजीवींची सर्रास कत्तल होईल हे मौलानांनी सांगितले होते आणि तसेच घडले हे जगाने पाहिले. हाऊस ऑफ लार्ड्सचे सदस्य लॉर्ड बटमली, ज्यांनी जवळपास 60 वर्षे इंग्लंड व भारताच्या राजकारणात भाग घेतला, ते मौलानांबद्दल म्हणतात, ‘मौलाना आझाद विशाल मनाचे व्यक्ती होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य व अखंडतेसाठी कायम प्रयत्नांची पराकाष्ठा केली. स्वातंत्र्यलढ्यात त्यांची भूमिका खूप मोलाची आहे. मौलाना आझाद यांना युरोपियन साहित्याचेही चांगले ज्ञान होते. महाकवी बायरन आणि फ्रान्सच्या कादंबरीकारांची त्यांना चांगली माहिती होती. 22 फेब्रुवारी 1957 रोजी मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन झाले. मौलाना आझाद यांच्या कार्याची दखल महाराष्ट्रानेही घेतली आहे. शरद पवार यांनी मौलाना आझाद यांच्या नावाने वित्तसंस्था उभारली आहे. या वित्तसंस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील अल्पसंख्याक, विशेषत: मुस्लिम समाजातील गरीब व्यावसायिकांना आर्थिक मदत होत आहे. हजारो अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जात आहे. इतर राज्यांतही मौलाना आझादांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक प्रकल्प राबवण्यात येत आहेत. हैदराबाद येथे मौलाना आझाद मुक्त विद्यापीठ उभारण्यात आले आहे. केंद्र सरकारने 1992 मध्ये मौलाना आझाद यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ किताब प्रदान केला. तसेच मौलाना आझादांचा जन्मदिवस 11 नोव्हेंबर हा ‘शिक्षण दिवस’ म्हणून साजरा करण्याचे केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

हिंदी भाषण क्र . 1

अबुल कलाम आजाद के जीवन पर निबंध


भारत के प्रसिद्ध मुस्लिम विद्वान,कवि, लेखक, पत्रकार और भारतीय स्वतंत्रता सेनानी मौलाना अबुल कलाम आजाद का जन्म 11 नवम्बर 1888 को मक्का नगर में हुआ.इनके पिता का नाम मौलाना खैरूद्दीन था वे अरबी के विद्वान थे और माता मदीना के मुफ़्ती की बेटी थी.
सन 1907 में मौलाना का परिवार कोलकाता आ गया. वे कुशाग्र बुद्धि के थे.इन्होने साहित्य, गणित और दर्शन का गहन अध्ययन किया.इन्हें शायरी और गद्य लेखन का शौक था.
12 वर्ष की उम्र में इन्होने ‘नैरंगे-आलम’ पहली पत्रिका निकाली. इसके बाद ‘लिसानुल सिदक’ दूसरा पत्र प्रकाशित किया.इस्लाम के लाहौर अधिवेशन में 15-16 वर्ष के मौलाना ने सधी और संयत भाषा में करीब ढाई घंटे तक भाषण दिया.इसके बाद इन्होने कई पत्रिकाओ का संपादन किया.
सन 1912 में इन्होने अपना प्रसिद्ध साप्ताहिक अख़बार ‘अलहिलाल’ निकाला जिसने लोगो में नयी जाग्रति की लहर पैदा कर दी. लेकिन सरकार के खिलाफ लिखने के जुर्म में इनको रांची (झारखंड) में 4 वर्ष तक जेल में कैद रहना पड़ा.
सन 1920 से ये महात्मा गाँधी के सम्पर्क में आये. राष्ट्रीय गतिविधियों में सक्रिय होने के कारण इन्हें कई बार जेल जाना पड़ा. इन्होने गांधीजी के असहयोग आन्दोलन को पूरा सहयोग दिया. इन्होने हिन्दू-मुस्लिम एकता, शांति, अनुशासन और बलिदान के लिए देशवासियों को आमंत्रित किया.
अबुल कलाम आजाद ने हिंदू-मुस्लिम एकता के लिए कार्य किया तथा वे अलग मुस्लिम राष्ट्र के सिद्धांत का विरोध करने वाले मुस्लिम नेताओ में से एक थे. खिलाफत आंदोलन में उनकी महत्वपूर्ण भूमिका रही.
सन 1923 में इन्हें कांग्रेस के विशेष अधिवेशन का अध्यक्ष बनाया गया और वे भारतीय नेशनल काग्रेंस के सबसे कम उम्र के अध्यक्ष बने. वह फिर सन 1940 में कांग्रेस के अध्यक्ष बने औरस्वतंत्रता प्राप्ति के समय अंग्रेजो से हुई विभिन्न वार्ताओ में शामिल हुए.
अगस्त सन 1947 को भारत के स्वतंत्र होने पर इन्हें शिक्षा मंत्री बनाया गया.स्वतंत्र भारत के पहले शिक्षा मंत्री रहे मौलाना ने 11 वर्षों तक देश की शिक्षा नीति का मार्गदर्शन किया. मौलाना आज़ाद को भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आई.टी.आई) और विश्वविद्यालय अनुदान आयोग का जनक माना जाता है.
मौलाना ने शिक्षा और संस्कृति को बढावा देने के लिए कई संस्थानों की स्थापना की जिसमे संगीत नाटक अकादमी (1953),साहित्य अकादमी (1954),ललितकला अकादमी (1954) शामिल हैं.
मौलाना ने शिक्षा,कला,संगीत और साहित्य के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य किये. उन्होंने प्रौढ़ शिक्षा और महिला शिक्षा पर अत्यधिक बल दिया. राष्ट्रीय एकता, धार्मिक सहिष्णुता और देशप्रेम का आदर्श प्रस्तुत करके यह यशस्वी और साहसी,साहित्यकार,पत्रकार और उच्चकोटि का राजनेता, 22 फ़रवरी 1958 को स्वर्ग सिधार गये.
इन्हें सन 1992 में मरणोपरान्त भारत रत्न से सम्मानित किया गया.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


हिंदी भाषण क्र . 2

मौलाना अबुल कलाम आज़ाद


'मौलाना अबुल कलाम आज़ाद' का जन्म 11 नवम्बर, 1888 को हुआ था। अबुल के पिता मौलाना खैरूद्दीन एक विख्यात विद्वान थे, जो बंगाल में रहते थे। उनकी माँ आलिया एक अरब थी और मदीन के शेख़ मोहम्मद ज़ाहिर वत्री की भतीजी थी। 
अरब देश के पवित्र मक्का में रहने वाले एक भारतीय पिता और अरबी माता के घर में उनका जन्म हुआ। पिता मौलाना खैरूद्दीन ने उनका नाम मोहिउद्दीन अहमद रक्खा। आगे चलकर वे मौलाना अबुल कलाम आज़ाद एवं मौलाना साहब के नाम से प्रसिद्ध हुए। तेरह साल की आयु में उनका विवाह ज़ुलैखा बेगम से हो गया ।
मौलाना आज़ाद एक विद्वान, पत्रकार, लेखक, कवि एवं दार्शनिक थे। इन सबसे बढ़कर मौलाना आज़ाद अपने समय के धर्म के एक महान विद्वान थे। उन्होंने 1912 में 'अल हिलाल' नामक एक उर्दू अख़बार का प्रकाशन प्रारम्भ किया। यह अख़बार भारत और विदेशों में बहुत जल्दी प्रसिद्ध हो गया। उन्होंने 1919 के रॉलेट एक्ट के विरोध में असहयोग आंदोलन को संगठित करने में सक्रिय भूमिका निभाई। उन्होंने भारतीय स्वतंत्रता संग्राम में भाग लिया। वह वरिष्ठ राजनीतिक नेता थे। स्वतंत्र भारत में मौलाना आज़ाद भारत सरकार के पहले शिक्षा मंत्री थे। 

मौलाना अबुल कलाम आज़ाद जब बोलते थे तो श्रोता मंत्रमुग्ध होकर उन्हें सुनते थे। वे एक प्रभावशाली वक्ता थे। भारत के पहले शिक्षा मंत्री बनने पर उन्होंने नि:शुल्क शिक्षा, भारतीय शिक्षा पद्धति एवं उच्च शिक्षा संस्थानों की स्थापना में अत्यधिक सराहनीय कार्य किया। भारतीय प्रौद्योगिकी संस्थान और विश्वविद्यालय अनुदान आयोग की स्थापना का श्रेय मौलाना आज़ाद को ही जाता है। 22 फ़रवरी सन् 1958 को मौलाना आज़ाद का निधन हो गया। वर्ष 1992 में मरणोपरान्त मौलाना आज़ाद को भारत के सर्वोच्च सम्मान 'भारत रत्न' से सम्मानित किया गया। एक इंसान के रूप में मौलाना महान थे, उन्होंने हमेशा सादगी का जीवन पसंद किया। मौलाना अबुल कलाम आज़ाद के जन्मदिवस 11 नवम्बर को भारत सरकार द्वारा राष्ट्रीय शिक्षा दिवस घोषित किया गया है।
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Short Essay on Maulana Abul Kalam Azad


इंग्रजी भाषण क्र . 1


'Maulana Abul Kalam Azad' was born on 11th November, 1888. His real name was Abul Kalam Ghulam Muhiyuddin. His father's name was Maulana Khairuddin, who lived in Bengal. His mother's name was Alia, who was an Arabian. He was married to Juleikha at the age of thirteen.

Maulana Azad was a journalist, author, poet and philospher. He started to publish the newspaper 'Al-Hilal' in the year 1912. Al-Hilal played an important role in forging Hindu-Muslim unity. He wrote many works, reinterpreting the holy Quran. He played an active role in the freedom movement of India. He became the first Education Minister of independent India.

Maulana Azad died on 22nd February, 1958. For his invaluable contribution to the nation, Maulana Abul Kalam Azad was posthumously awarded India's highest civilian honour, Bharat Ratna in 1992. His birth anniversary 11th November is declared as National Education Day by the Government of India. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इंग्रजी भाषण क्र . 2

Born in Mecca in 1888, Maulana came to India in 1890 as a child. The best part of his formative years was spent in Calcutta. In 1916, he was to meet Gandhiji in Calcutta, and was greatly influenced by his speeches.
Azad joined the freedom movement of India, and was arrested by the British for his seditious writings, and detained in jail at Ranchi for four years. On his release in January, 1920 he met Gandhiji in the latter's Sabarmati Ashrama, and became his ardent follower.
Maulana Abul Kalam Azad was a profound scholar, a great patriot and a veteran statesman. He was an outstanding Muslim whom no provocation and no pressure could deflect from the path of nationalism. He became the symbol of Hindu-Muslim unity, enjoying in a large measure the confi­dence of both the communities even on trying occasions.
Azad was highly respected by the Muslims, even when he was very young, as he was a great scholar of merit. He was a reputed scholar of the Quran. As an orator in Urdu, he was unrivalled. He edited the famous paper Liasanus Side at the age of fifteen. Poet Hali described Azad as 'an old head on young shoulders'.
Azad took part in all the Congress movements launched by Gandhiji, and was jailed number of times as a freedom fighter. Azad became the President of the Congress Party in 1940, as a prominent member of the Congress. But his dream of one composite nation was shattered, when India was divided on the eve of her independence. He became a sad man.
Maulana Abul Kalam Azad died on 22 February, 1958.

Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. The information given by you has made it very easy for us to understand Abul Kalam. Really he was a very great person...
    Great Information Bro..

    ReplyDelete