Type Here to Get Search Results !

Fatima Sheikh Jayanti Marathi Information, Speech,Anchoring

Fatima Sheikh Jayanti Marathi Information, Speech,Anchoring

फातिमा शेख जयंती मराठी माहिती, भाषण, सूत्रसंचालन.



        १८व्या शतकाच्या मावळतीस अखेरच्या घटका घेणाऱ्या मराठी रीयासती मधील पराक्रमांचे नव नवे शिखर स्थापन करणाऱ्या पेशवाईच्या उत्तरयानातला हीन –दिन काळ्या कृत्यांनी भरलेला कालखंड.स्त्री म्हणजे केवळ भोग आणि भोग एवढेच समीकरण रूढ झालेलं. ज्या छत्रपती शिवरायांनी स्त्रियांचा अब्रू बेअब्रू करणाऱ्यांची गर्दन मारली त्यांचाच राज्यात स्त्रीला भोगाची वस्तू म्हणून वापरला जावू लागला होतं. समाजात समजाचे ठेकेदार म्हणवणारे लहान मुलामुलींचे लग्न पाळण्यातच लावत होते. लग्न म्हणजे काय नवरा म्हणजे काय याची पुसटशी ही कल्पना नसणाऱ्या निष्पाप जीवाला लग्नाच्या बंधनात अडकवले जात होते. वय पहायचे नाही शारीरिक परिस्थिती पाहायची कुण्याही वयोवृद्ध व्यक्तीसोबत लग्न लावून देण्यात येई, आणि मग अजाणत्या वयात येणाऱ्या विधवापणात केशवपण,आणि घराचा एक कोपरा एवढंच मरेपर्यंत आयुष्य बनलेल्या स्त्रीचा तो काळ. ना कुठल्या समारंभात भाग ना कधी गोडधोड इतकी भयानक परिस्थितीत विधवा त्यांचा आयुष्य जगत होत्या, जगत कसल्या तर हाडामासाच जिवंत प्रेत घेवून फिरत होत्या.

     अश्या ह्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत फुले दाम्पत्या पुढे आलं. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोन्ही महनीय दाम्पत्याने १६० वर्षापूर्वी स्त्री व शुद्र शिक्षण हक्कासाठी आयुष्याचा होम केला. महात्मा फुलेंनी स्त्री-शूद्रांना लिहिण्यावाचनाचे शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांची ज्ञानाची दारे उघडली जाणार नाहीत म्हणून त्या सर्वांसाठी शाळा सुरु करण्याचा निर्धार त्यांनी केला. त्या काळी मुलीना शिकवण्यासाठी सनातनी लोकांचा प्रखर विरोध होता. मुलीना शिकवण्यासाठी एक स्त्री शिक्षिका पाहिजे होती. त्यावेळी ती मिळणे दुरापास्त नव्हे तर अशक्यप्राय होते. जोतीबांनी मग आपल्या धर्मपत्नी सावित्रीबाईना मुळाक्षरापासून लिहिण्यावाचण्यास शिकवले. हा प्रकार समाजातील तथाकथित धर्माच्या ठेकेदारांना व उच्चभ्रू लोकांना रुचला नाही. त्यांनी अखेरीस गोविंदरावांचे कान फुंकून जोतीबांना व सावित्रीबाईना घराबाहेर काढायला लावले.
  अशा बिकट परिस्थितीत सगळीकडे अंधारून आले असताना मदतीचा हात आला तो ज्योतीबांचे मित्र उस्मान शेख यांचा. त्यांनी जोतीबांना आपल्या घरी आणले. एवढेच नाही तर स्वयंपाकासाठी आवश्यक ती भांडी-कुंडी दिली. स्त्रीशिक्षणाचा वसा घेतलेल्या जोतीबाना पुन्हा आपल्या कार्यास नव्याने सुरवात केली.
   जोतिबा मातंग,महार लोकांच्या वस्तीत राहत. तेथे मोमीन, पिंजारी, अशा लोकांची वस्ती होती. आज त्या भागाला मोमीनपुरा बोलतात. या शैक्षणिक कार्यात जोतीबांना सावित्रीबाई साथ देत होत्याच त्यातच त्यांना महत्वाचा आधार मिळाला साथ मिळाली ती फातिमा शेख त्यांचा मित्रा उस्मान शेख यांचा पत्नीची. ज्या पद्धतीने स्त्री शिक्षण म्हटले कि सावित्रीबाई आठवतात तसाच मुस्लीम स्त्री शिक्षण म्हटलं कि फातिमा शेख यांचे नव अग्रक्रमात घेतले जाते.
   त्यावेळेची हिंदू स्त्रियांची होती त्याहीपेक्षा प्रतिकूल आणि भयानक परिस्थिती होती मुलीम स्त्रियांची . बुरखा पध्दती, घराबाहेर न पडणे, परक्या व्यक्तीशी न बोलणे अशा समाजात फातिमा शेख वाढल्या नी वावरत होत्या. त्यावेळी त्यांनी सावित्रीबाईंचे स्त्री शिक्षणाचे अविरत कार्य पहिले, त्याकामी सावित्रीबाईची जिद्द चिकाटी पाहून फातिमा शेख यांनी सुद्धा आपले पाऊल त्यांचा पावलावर ठेवत मुस्लीम स्त्री शिक्षणाचे कार्य सुरु केले. आपण केवळ सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांनाच स्त्री शिक्षणाप्रती लक्षात ठेवले त्याप्रमाणात फातिमा शेख आपल्या लक्षात नाहीत.
   ज्या प्रमाणे हिंदू स्त्रिया शिक्षण घेत आहेत तर मुस्लीम स्त्रियांनीदेखील शिक्षण घ्यायला हवे असे असे आवर्जून वाटून त्यांनी मुस्लीम समाजातील स्त्रियांमध्ये जागृती घडवून आणण्याचे कार्य सुरु केले . मुस्लीम धर्मात वा कुरणात असे कुठेही लिहिलेले नाही कि मुस्लीम स्त्रियांनी शिक्षण घेवू नये. या सर्व अफवा तुम्ही आम्ही व त्या काळाच्या मुल्ला मौलवींनी पसरवल्या आहेत.

तेव्हा सर्व स्त्रियांनी शिक्षण हे घेतलेच पाहिजे. चूल व मूल एवढेच आपले क्षेत्र ना ठेवता पुढच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. हा संदेश त्यांनी मुस्लीम स्त्रीयानाम्ध्ये रुजवला, फुलवला, जोपासला .
   एक स्त्री शिक्षित झाली तर घर हे शाळा बनते कारण आई ही पहिली मुलांची गुरु असते म्हणून फातिमा शेख यांनी सुरु केलेले कार्य पुढे सुरु ठेवलेचं पाहिजे. काही मुस्लीम स्त्रियांनी हे कार्य चालू ठेवले आहे. बहुतांशी लोकांचा हा समज आहे कि,मुस्लीम स्त्रिया शिकत नाहीत, परंतु हे आत्ता तितकेसे खरे नाही, कारण सद्य स्थितीत विविध क्षेत्रात उच्च पदावर स्त्रिया विराजमान आहेत, त्या जणू भासवत आहेत कि आंम्ही अल्लाच्या मुली आत्ता मुळी मागे राहणार नाही.
     श्रीमती सलमा खान, माजी उपक्रीडा संचालक, प्राचार्य मुमताज सय्यद, मरियन तडवी, विक्रीकर अधिकारी, श्रीमती हसीना बानू यांनी तर पुण्यात पहिली मुस्लीम अंगणवाडी शाळा सुरु केली. यानसारख्या अनेक मुस्लीम महिला आज शिक्षण घेवून महत्वाचा अधिकार पदावर, खेळात, राजकारणात, वैद्यकीय क्षेत्रात, वकिली क्षेत्रात, पत्रकारितेत उत्तुंग झेप घेत आहेत. त्यांचा आजच्या ह्या ह्यासाची मुहूर्तमेढ ज्या फातिमा शेख यांनी रोवली त्यांना कसं विसरता येईल? अजूनही बहुतांशी मुस्लीम स्त्रिया शिक्षण घेताना आढळत आहेत त्या साऱ्यांनी फातिमा शेख यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षण घ्यायला सुरुवात करावी. त्यामधून कदाचित या जगाला नवी फातिमा शेख

मिळेल.

Post a Comment

2 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad