#गटारी आषाढ अमावस्या - "दीपपूजन" कि "गटारी" ?
आषाढ अमावस्या म्हटले कि सहसा कुणाच्या लक्षात येणार नाही, पण गटारी आमावस्या सगळ्यांनाच माहित आहे.
श्रावण सुरू होण्याआधीचा एक दिवस म्हणजेच "गटारी".श्रावण महिन्यात येणाऱ्या सणांच स्वागत करणारा आजचा दिवस. लोड झालं नं भावांनो !!! लोड घेवू नका. श्रावणात महिनाभर मांसाहार करत नसल्याने या दिवशी मद्यसेवन आणि मांसाहारावर उभा आडवा हात मारला जातो. जे लोक श्रावण पाळत नाही ते सुद्धा गटारी दणक्यात साजरा करतात, अर्थात "पीने वालो को पीने का बहाना चाहिए" ;-), मग तो वर्षभरातील कुठलाही दिवस असो.
🍺 #गटारी अमावस्या :
दिव्याची अमावास्येचं आपलं महत्त्व असलं तरी अनेक लोकं ही अमावस्या गटारी अमावस्या म्हणून साजिरी करतात. श्रावण महिन्यात अनेक लोकं मांस, मद्य व इतर अनेक पदार्थांचे सेवन वर्ज्य करतात. हा एक महिना सुरू होण्याआधी या पदार्थांचे भरपूर सेवन करण्याची अनेक ठिकाणी परंपरा झाली आहे. या दिवशी भरपूर प्रमाणात मांस-मच्छी खाणे, दारू पिऊन धुंद होणे अशा प्रकारचे नियोजन केले जाते. या दिवसात वर्षभर न दिसणार्या रानभाज्या बाजारात येतात, माश्यांच्या पैदाशीचा हा काळ, याच महिन्यात आपले बरेचसे सणही येतात आणि पावसाचे दिवस असल्याने मांसाहार पचायला देखील जड असते. म्हणुनच या महिन्यात मांसाहार वर्ज्य मानला जातो.
पुढील संपूर्ण श्रावण महिना सण-वार आणि उपवास घडणार असल्याने श्रावण सुरू होण्यापूर्वी अमावस्येच्या दिवशी पिऊन आणि मांसाहार करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो. जे नियम पाळत नाही तेही हा दिवस मात्र जोरात साजरा करतात. कारण पिण्यार्यांना तर पिण्याचा बहाणा पाहिजे. त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच. मद्यसेवन करून गटारीत लोळण्यासाठीच हा दिवस असतो. अर्थात ती साजरी करताना कोणीच गटारात वगैरे लोळत नाही.
=====================================
शप्पथ सांगतो शास्त्र काय सांगतं गटारी बद्दल!
शास्त्र कधीच दारू पिण्यास सांगत नाही. पण हा मटण खाण्याबद्दल आपल्याच प्रथा परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्या कशा दर पहिला देवदेव करुन नंतर मटणावर ताव मारणाऱ्या प्रथा. आदल्या दिवशी देवाची पालखी दूसऱ्या दिवशी मटण. आदल्या दिवशी संक्रात दूसऱ्या दिवशी किंक्रातीच मटण. आदल्या दिवशी होळी दूसऱ्या दिवशी धुलवड अस आपल्या सणांच स्वरुप. मग श्रावण संपल्यावर गटारी पाहीजे होती ती आधी कशी काय.
खर सांगू का या गोष्टीला काहीच लॉजीक नाही. तस दारू पिण्याला तरी काय लॉजीक आहे तर मग दारूच्या या सणाला लॉजीक असण्याची अपेक्षा करणचं चुकिचं आहे !
तरी त्यातल्या त्याल आम्ही तुमचं समाधान करण्यासाठी गावभर विचारून माहिती गोळा केली. ती माहिती अशी की,गटारी अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या किंवा आषाढी अमावस्या. दूसरा दिवस हा श्रावणाचा. श्रावणाचा महिना हा पवित्र, सणउत्सवांचा असल्यानं श्रावणात सामिष आहार आणि मद्याला हात न लावण्याचा दंडक. त्यानंतर लगेचच गणपती उत्सवाचा पंधरा दिवसाचा कालावधी. त्यानंतर नवरात्र व नंतर दसरा. थोडक्यात काय तर काहीजण आज मटण खाण्याच सोडलं की थेट दसरा झाल्यानंतरच खाण्यास सुरवात करतात. म्हणूनच आजच्या दिवशी घराघरात मासे, चिकण, मटण खाण्याचा बेत आखला जातो.
🆕 मकर संक्रांत मराठी निबंध भाषण
आषाढी अमावस्या मुहूर्त :
आषाढी अमावस्या 31 जुलै दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून 1 ऑगस्टच्या सकाळी 8.42 मिनिटांपर्यंत आहे.
यंदा श्रावण महिना 30 ऑगस्टला संपणार आहे. त्यानंतर लगेच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यामुळे अनेक घरात सुमारे दीड दोन महिन्यांनंतर मांसाहाराचा बेत रंग़णार आहे.
#“दीप अमावस्या” #गटारी ,मराठी माहिती :
येत्या 31तारखेला असलेली “गटारी” अमावस्या म्हणजे मुळातील आपली “दीप अमावस्या”…
शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि विनाशाय दीपत्ज्योति नमोस्तुते ||
पंचमहाभूतांमधील एक म्हणजे – अग्नी देव … त्याचेच रूप म्हणजे आपला दिवा.
दिव्याचे स्थान आपल्या घरोघरी देवघरात तर आहेच पण प्रत्येक शुभ कार्यात आपण तेलाचा आणि तुपाचा असा दिवा जरूर लावतो. आपण केलेले एखादे कर्म ह्याची साक्ष म्हणजे दिवा असतो असे आपल्या शास्त्रात म्हणले आहे. कितीही Tubelights आल्या, विविध प्रकारचे इलेक्ट्रिक दिवे आले तरी जी शांती आणि समाधान आपल्याला समईच्या ज्योतीकडे पाहून मिळते ते असंख्य इलेक्ट्रिक रोषणाईने सुद्धा मिळत नाही.
का साजरी करतात दीप अमावस्या?
आपल्या संस्कृती अनेक लहान मोठे सण विविध अर्थ घेऊन येतात. असाच एक सण म्हणजे दीप अमावस्या. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. यंदा ही दीप अमावस्या बुधवार, 31 जुलै रोजी आहे.
पूर्वी श्रावणात अंधारून येत असे आणि भरपूर पाऊस पडत असे. त्यामुळे पुढील बदलणाऱ्या हवामानाची पूर्वतयारी म्हणून घरात असलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस. त्यामुळे या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचा रिवाज सुरु झाला असावा.
ह्या दिवशी दीप पूजन कसे करावे?
आपल्या घरातील, काना कोपऱ्यातील, कपाटातील चांदीचे, पितळेचे दिवे घासून पुसून स्वच्छ करायचे. संध्याकाळी दिवेलागणीला ह्या सर्व दिव्यांची पूजा करायची. रांगोळी काढायची. पाटावर दिवे मांडून त्यांना गंध, फूल आणि अक्षता वाहायच्या. नमस्कार करायचा. गोडाचा नैवेद्य दाखवायचा. नैवेद्याला कणकेचे गोडाचे दिवे ठेवण्याची खरी प्रथा आहे. पण जमले नाही तर कुठलाही गोडाचा नैवेद्य दाखवायचा.पाटावर ठेविलेल्या दिव्यांची आरती करायची. दिव्यांची प्रार्थना करायची. “आमच्या जीवनातील, मनातील, बुद्धीतील सर्व अंधःकार नष्ट होउदे. जसा दिवा इतरांचे आयुष्य प्रकाशमान करतो तसेच आमच्या हातून सुद्धा देशासाठी, समाजासाठी काहीतरी हिताचे होउदे.”
आपल्याकडे प्रत्येक प्रथेमागे, सणामागे काही ना काही सामाजिक आणि शास्त्रीय कारणे ही आहेतच. दीप अमावास्येच्या दुसऱ्या दिवशीपासून महाराष्ट्रात श्रावण सुरु होतो. ऊन-पावसाचा खेळ. अंधार देखील लवकर पडू लागतो. कदाचित म्हणूनच पूर्वी दीप अमावास्येच्या निमित्ताने घरातील सर्व दिवे बाहेर काढून त्या योगे त्यांची स्वच्छता व्हावी असे अध्यारूत असावे.
ह्या वर्षी अनायासे रविवारी आलेली दीप अमावस्या आपण पारंपरिक पद्धतीने अगदी सहजपणे साजरी करूयात आणि येणाऱ्या श्रावण मासाचे स्वागत करूयात…