Type Here to Get Search Results !

आज 29 जुलै_ जागतिक वाघ (व्याघ्र) दिवस मराठी माहिती!

🐯 आज 29 जुलै_ जागतिक वाघ दिवस मराठी माहिती!


🤔 का साजरा केला जातो? : 


जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी जगभर साजरा केला जातो. 29 जुलै 2010 रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.


🎯 उद्देश :


 या दिवसाचा उद्देश वाघांच्या नैसर्गिक अधिवासांच्या संवर्धनासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करणे, तसेच त्याबद्दल जनजागृती करणे आणि वाघांच्या संवर्धनासाठी येणाऱ्या समस्यांवर विचार करणे असा आहे.


💁‍♂ हे जाणून घ्या : 


▪ विसाव्या शतकाच्या सुरूवातीला जगभरात सुमारे 1,00,000 वाघ होते,
▪ सध्या ही सध्या सुमारे 3062 ते 3948 इतकी असल्याचा अंदाज आहे.
▪ यापैकी सुमारे 2000 वाघ भारतीय उपखंडात आहेत.
▪ वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्याची कारणे नैसर्गिक अधिवास नष्ट होणे, चोरटी शिकार इ. आहेत.

🧐 वाघांची संख्या कमी होण्याची कारणे : 


अवैध शिकार. वाघाची हाडे, कातडे व इतर अवयवांपासून बनवलेल्या औषधांना चीन, इंडोनेशिया व व्हिएतनाम येथे मोठी मागणी आहे. मोठ्या आर्थिक फायद्यासाठी तस्करांची साखळी विणली गेली आहे.


📍 चला वाघ वाचवूया! : 


हा दिवस साजरा करताना या वाघोबांचे जंगलातील अस्तित्व सुरक्षित व्हावे आणि ती गगनभेदी डरकाळी पुन्हा एकदा घुमावी यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.

⭐ विशेष :


 जगात फक्त चीन, रशिया, मलेशिया, इंडोनेशिया, बांगलादेश, थायलंड, तिबेट, नेपाळ, भूतान अशा अगदी बोटांवर मोजता येतील एवढ्याच देशांमध्ये वाघांच्या निरनिराळ्या जाती आढळतात. जगातील एकूण वाघांपैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त वाघ भारतात असल्यामुळे त्यांचे संवर्धन करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad