💁♂ आज 28 जुलै जागतिक हिपॅटायटिस (कावीळ ) विरोधी दिवस. मराठी माहिती!
🤔 का साजरा केला जातो हिपॅटायटिस (कावीळ ) विरोधी दिवस. ? :
जागतिक किर्तीचे संशोधक डॉ. बरूच ब्लूमबर्ग यांनी ‘हिपॅटायटिस ई’ या विषाणूचा शोध लावला. त्याबद्दल त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 28 जुलै हा दिवस जागतिक हिपॅटायटिस दिवस साजरा केला जातो.
👀 हिपॅटायटीस म्हणजे काय? :
हिपॅटायटिस या आजाराला बोली भाषेत काविळ असे म्हणतात. संसर्गजन्य रोगांपैकी एचआयव्ही, टीबी, मलेरिया या रोगांची ज्याप्रमाणे जनजागृती झाली आहे, त्याच धर्तीवर हिपॅटायटिसबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे.
🔢 आकडेवारी :
▪ जगभर दरवर्षी 14 लाख लोक हिपॅटायटिसमुळे मृत्युमुखी पडतात.▪ भारतात आजच्या घडीला 4 कोटी लोकांना हिपॅटायटिसची लागण झाल्याचे सांगण्यात येते
📍 विषाणू बाबत माहिती :
हिपॅटायटीस आजाराला कारणीभूत होणारे 6 प्रकारचे विषाणू शोधण्यात आले आहेत. त्यांचे वर्गीकरण ‘ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’, ‘इ’ आणि ‘जी’ असे करण्यात आले. यापैकी ए व इ हे विषाणू मुख्यत: दुषित अन्न व पाण्यावाटे पसरतात.
👉 आजार व लक्षणे :
पावसाळ्यात या रोगाचे प्रमाण वाढते. दाट लोकसंख्या, अस्वच्छता, पाण्याचे कृत्रिम साठे, दूषित अन्नपदार्थ, उघड्यावरील व कच्चे अन्न यांचे सेवन यामुळे याची प्रामुख्याने लागण होते. हा आजार सर्व वयोगटातील लोकांना होतो. पण लहान मुले व तरुण वर्गात याचे प्रमाण अधिक आहे. हा विषाणू आतड्यातील पेशींमध्ये प्राथमिक प्रजनन करतो व नंतर रक्ताद्वारे तो यकृतातील पेशींवर हल्ला करून दूषित करतो.
🚫 हिपॅटायटिस रोखण्यासाठी :
स्वच्छतागृहात जाऊन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवा, शिजवलेले ताजे अन्न खा, उकळलेले पाणी किंवा बाटलीबंद पाणी प्या, कच्च्या भाज्या धुतलेल्या व व्यवस्थित स्वच्छ केल्या असतील तरच कच्च्या खा, हिपॅटायटिसची साथ असलेल्या भागात जाणार असाल तर ‘हिपॅटायटिस ए’ची लस घ्या, टूथब्रथ, रेझर किंवा मॅनिक्युअरची साधने सामूहिक पद्धतीने वापरू नका, मद्यपान पूर्णपणे टाळा.
सर्व प्रकारच्या काविळीचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावीपणे माहिती व शिक्षण व सुसंवादाची गरज आहे. हिपॅटायटिसबद्दल शास्त्रीय माहिती जाणून घेऊन राहाणीमानात योग्य तो बदल केला पाहिजे. मुंबईतील आकडेवारीचे मूल्यमापन केले, तर मुंबईतील पेशंटचे प्रमाण व मृत्यू कमी झाल्याचे दिसून येते. योग्य काळजी व वेळेवर निदान केल्यास घाबरण्याचे कारण नाही. - डॉ. रमेश भारमल, नायर हॉस्पिटलचे डीन व हिपॅटायटिस - विषाणूंचे अभ्यासक
गावठी औषधांपासून दूर राहा सध्या पावसाचा जोर वाढल्यामुळे मुंबई व नवी मुंबईत हिपॅटायटिसचे अनेक पेशंट आढळून येत आहेत. त्यावर वेळीच उपाय न केल्यास पेशंट दगावू शकतो. पावसाळ्यात होणारी कावीळ ही हिपॅटायटिस ए किंवा सी या प्रकारातील असते. शहर व ग्रामीण भागातील पेशंट अनेकदा डॉक्टरशी सल्लामसलत न करता परस्पर गावठी औषधे घेतात. त्यामुळे कावीळ शरीरात पसरून पेशंट कॅन्सरला बळी पडू शकतो, असे मत स्टर्लिंग व्होकार्ड हॉस्पिटलमधील डॉ. अमित घरत व्यक्त करतात.
जगातील आठव्या क्रमांकाचा जीवघेणा आजार >
हिपॅटायटिस बऱ्याच विषाणूमुळे होऊ शकतो. पण प्रामुख्याने सहा विषाणू असे आहेत की त्यांना हिपॅटायटिसचे विषाणू म्हणून ओळखले जाते. > हिपॅटायटीस ए , बी, सी, डी, ई, व जी असे सहा विषाणू आहेत. > या विषाणूंसह दुसरे विषाणूही हिपॅटायटिस होण्यास कारणीभूत. उदा. यलो फिव्हर विषाणू व इतर अनेक आहेत.