परशुराम जयंती ,मराठी माहिती,Parshuram jayanti 2019 :
वैशाख महिन्यामध्ये शुद्ध तृतीयेला साजरा केला जाणारा सण म्हणजे अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2019). हा सण देशभरात मोठ्या उत्सहात साजरा केला जातो. दरम्यान, या सणादिवशीच भगवान शिवभक्त परशुराम (Parshuram) जयंती असते.
या दिवशी विष्णूचा (Lord Vishnu) सहावा अवतार परशुरामाचा (Lord Parshuram) जन्म झाल्याचे सांगण्यात येते त्यामुळे अक्षय्य तृतीया व परशुराम जयंती (Parshuram Jayanti) असा दुहेरी योग यादिवशी अनुभवायला मिळतो. जमदग्नी आणि रेणुका यांचा पुत्र परशुराम एकीकडे भयंकर रागीट स्वभावाचा असल्याचे पाहायला मिळते, तर दुसरीकडे शंकराचा (Lord Shankar) निस्सीम भक्त परशुराम हे न्यायाची देवता म्हणून ओळखले जात असे.
परशुरामाने पृथ्वी 21 वेला निक्षत्रीय केली होती असा उल्लेख पुराणात आढळतो. स्कंद पुराण आणि भविष्य पुराणात सांगितल्या प्रमाणे परशुराम यांचा जन्म भृगुश्रेष्ठ महर्षि जमदग्नि द्वारा सम्पन्न पुत्रेष्टि यज्ञातून प्रसन्न झालेल्या देवराज इंद्राच्या वरदानातून पत्नी रेणुका हिच्या गर्भातून झाला. हा जन्म वैशाख शुक्ल तृतीयेला झाला. त्यामुळे परशुरामास विष्णुचा अवतारही मानले जाते.
श्रीगणेशला परशुरामाच्या रागाची प्रचिती :
पुराणाच्या अनुसार परशुराम हे महादेवाचे भक्त होते, एकदा शंकराचे दर्शन घेण्यासाठी त्यांनी थेट कैलास पर्वत गाठायचे ठरवले. त्यानुसार ते पर्वतावर पोहचले मात्र वाटेत श्री गणेश आणि परशुरामाची भेट झाली, गणेशाने पर्वतावर येणायचे कारण विचारत परशुरामाची वाट अडवून ठेवली ज्यामुळे क्रोधीत होऊन परशुरामाने आपले शास्त्र परशू वापरून गणेशाच्या दातावर वार केला, यामध्ये बाल गणेशाचा एक दात तुटल्याने यानंतर त्याला एकदंत म्हणून ओळखले जाऊ लागले.
रामायणातील शिवधनुष्य :
रामायणात सीता स्वयंवरामध्ये जे शिवधनुष्य मोडून रामाने पराक्रम केला ते धनुष्य मूळ परशुरामाचे होते असा उल्लेख पाहायला मिळतो. आपले धनुष्य मोडल्याने संतापलेल्या परशुरामाने थेट लक्ष्मणाशी संवाद साधत आपला राग व्यक्त केला होता. ज्यानंतर रामाने आपले सुदर्शन चक्र परशुरामाला देऊ केले. असे म्हणतात, की हे तेच सुदर्शन चक्र आहे जे द्वापार युगात श्रीकृष्णाच्या हातात दिसून आले होते.
मातृहत्येचे पाप
परशुराम हे पिता जमदग्नी व माता रेणुकेचे चौथे आपत्य होते. जमदग्नीचास्वभाव हा इतका रागीट होतेकी आजही एखाद्याचा संताप व्यक्त कारण्यासाठी त्यांच्या नावाचे रूपक वापरले जाते. याच रागात येऊन एकेदिवशी जमदग्नीच्या परशुरामाला रेणुका मातेचा वाढ करण्याचे आदेश दिले होते, पित्याच्या आदेशाचे पालन केल्याने परशुरामावर मातृहत्येचे पाप लागले होते. या पापातून मुक्ती मिळावी याकरीत परशुरामाने भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केलीज्यानंतर प्रसन्न होऊन शंकराने त्यांना परशु अस्त्र प्रदान केले. यामुळेच नंतर त्यांना परशुरामाच्या नावाने ओळखले जाऊ लागले.
परशुरामाने का केला क्षत्रियांचा नाश?
पौराणिक कथांनुसार एकदा सहस्त्रमुनी आपल्या संपूर्ण सेनेसोबत जमदग्नीच्या आश्रमात भेटीसाठी आले होते. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी जमदग्नी ऋषींनी आपल्या जवळील कामधेनू गायीचे दूध देऊ केले , मात्र कामधेनूची इच्छापूर्तीची क्षमता ज्ञात असलेल्या हव्यासी सहस्त्रमुनींनी आपल्या शक्तिचा गैरवापर करून तिला आपल्याकडे वळवून घेतले, या प्रसंगाने क्रोधीत होऊन जमदग्नी ऋषींनी सहस्त्रमुनींचा वध केला. या घटनेबाबत कळल्यावर सहस्त्रमुनींच्या पुत्रांनी जमदग्नी ऋषींचा वाढ केला. वडिलांच्या विरहाने दुखी व संतापलेल्या परशुरामाने पृथ्वीवरील संपूर्ण क्षत्रिय प्रजातीचा समूळ नॅश करण्याचा प्राण घेतला आणि त्यानुसार त्यांनी पूर्ण २१ वेळा पृथ्वीवरील क्षत्रियांचा समूळ नाश केल्याचे सांगितले जाते.
परशुरामाला अंत नाही
परशुरामाला अमरत्व प्राप्त असल्याने आजही जगात त्यांचे अस्तित्व पाहायला मिळते असे मानण्यात येते. याशिवाय परशुरामाचे भूतलावरील वास्तव्य पाहिल्यास रामायण व महाभारत या दोन्ही पुराणांमध्ये त्यांचा उल्लेख पाहायला मिळतो. रामायण हे त्रेता युगात व महाभारत हे द्वापार युगात घडले होते, पृथ्वीच्या निर्मितीपासून एक युग म्हणजे साधारण लाखो वर्षांचा कालावधी असतो, यानुसार परशुरामाचे अस्तित्व हे अनादी काळापासून टिकून आहे असे समजते.
श्री विष्णूंच्या इतर अवतारांप्रमाणे परशुरामाचे पूजन केले जात नसले तरी आजही भारतातील, गोवा, केरळ, कोकण या समुद्र्किनारी वसलेल्या विभागांमध्ये परशुरामाची मंदिरे पाहायला मिळतात