Type Here to Get Search Results !

मातृदिन (Mother day ) ची सुरुवात कशी झाली, जाणून घ्या त्याचा इतिहास,मदर डे मराठी माहिती,निबंध, सूत्रसंचालन!

मातृदिन (मदर्स डे) इतिहास,मदर डे मराठी माहिती,निबंध, सूत्रसंचालन!



जग भरात 12 मे रोजी मदर्स डे साजारा केला जातो. तसं तर प्रत्यके दिवस आईचाच असतो पण आजच्या धावपळीच्या जीवनात आम्ही आमच्या आईला जास्त वेळ देऊ शकत नाही. मुलांच्या आनंदसाठी त्या आईने आपल्या सर्व त्रासांकडे दुर्लक्ष केले तर आज तिच्यासोबतच करू हा खास दिवस. मदर्स डे जास्त करून मे च्या दुसर्‍या रविवारी साजरा केला जातो. पण काही देशांमध्ये वेग वेगळ्या तारखेत देखील साजरा करण्यात येतो हा दिवस. जाणून घ्या कशी झाली या दिवसाची सुरुवात. 

मदर्स डेबद्दल बरीच वेग वेगळी मान्यता आहे. काहींचे मानणे आहे की मदर्स डे च्या या खास दिवसाची सुरुवात अमेरिकेत झाली होती. वर्जिनियामध्ये एना जार्विस नावाच्या महिलेने मदर्स डेची सुरुवात केली होती. असे म्हटले जाते की एना आपल्या आईशी फार प्रेम करत होती आणि तिच्याकडून बरीच काही तिने शिकले होते. तिने कधीही लग्न केले नाही आणि आईच्या निधनानंतर तिने तिच्याप्रती आदरम्हणून ह्या खास दिनाची सुरुवात केली. ईसाई समुदायाचे लोक या दिवसाला वर्जिन मेरीचा दिवस मानतात. युरोप आणि ब्रिटनमध्ये मदरिंग संडे म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो.

🍫 Chocolate Day wishes in marathi

याच्याशी निगडित एक कथा अशी देखील आहे की मदर्स डेची सुरुवात ग्रीसहून झाली होती. ग्रीसचे लोक आपल्या आईचा फार सन्मान करतात. म्हणून ह्या दिवशी ते तिची पूजा करतात. मान्यतेनुसार, स्यबेसे ग्रीक देवतांची आई होती आणि मदर्स डे च्या दिवशी ते तिची पूजा करत होते.

या वर्षी मदर्स डे 2019ची थीम आहे बॅलेंस फॉर बेटर (#balanceforbetter).  या थीमचे मुख्य उद्देश्य जगात जेंडर बॅलेंस अर्थात लिंग संतुलन कायम ठेवणे गरजेचे आहे. आईचा प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा योगदान असतो. ही आईच असते जी कधीही आपल्या जबाबदार्‍यांपासून तोंड फिरवत नाही.

9 मे 1914 रोजी अमेरिकी प्रेसिडेंट वुड्रो विल्सनने एक कायदा पारित केला होता. या कायद्यात लिहिले होते की मे च्या दुसर्‍या रविवारी मदर्स डे साजरा करण्यात येईल. यानंतर भारत समेत बर्‍याच देशांमध्ये हा खास दिवस मेच्या दुसर्‍या रविवारी साजरा करण्यात येऊ लागला. तर मग या वर्षी मदर्स डे चा  हा खास दिवस आपल्या आईसोबत साजरा करूया. ते सर्व काही करा जे तुम्ही व्यस्त असल्यामुळे करू शकत नाही. आईला तिच्या आवडीचे नक्की काही घेऊन द्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad