Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र दिनाचा इतिहास,महाराष्ट्र दिन मराठी माहिती ,जागतिक कामगार दिन मराठी माहिती ,सूत्रसंचालन, भाषण, घोषणा!

महाराष्ट्र दिनाचा इतिहास,महाराष्ट्र दिन मराठी माहिती ,जागतिक कामगार दिन  मराठी माहिती ,सूत्रसंचालन, भाषण, घोषणा!


२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले त्यामुळे मराठी माणसे चिडली होती. सर्वत्र छोट्यामोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले.

त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहीं मुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांना गोळीबाराचा आदेश मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे देण्यात आला. गोळीबारात झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ आंदोलक हुतात्मे झाले.


■ १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन सूत्रसंचालन!



या हुतात्म्यांच्या बलिदानापुढे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर इ.स. १९६५मध्ये त्या जागी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली.

हुतात्म्यांची नावे

२१ नोव्हेंबर इ. स. १९५५ चे हुतात्मे १] सिताराम बनाजी पवार २] जोसेफ डेव्हिड पेजारकर ३] चिमणलाल डी. शेठ ४] भास्कर नारायण कामतेकर ५] रामचंद्र सेवाराम ६] शंकर खोटे ७] धर्माजी गंगाराम नागवेकर ८] रामचंद्र लक्ष्मण जाधव ९] के. जे. झेवियर १०] पी. एस. जॉन ११] शरद जी. वाणी १२] वेदीसिंग १३] रामचंद्र भाटीया १४] गंगाराम गुणाजी १५] गजानन ऊर्फ बंडू गोखले १६] निवृत्ती विठोबा मोरे १७] आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर १८] बालप्पा मुतण्णा कामाठी १९] धोंडू लक्ष्मण पारडूले २०] भाऊ सखाराम कदम २१] यशवंत बाबाजी भगत २२] गोविंद बाबूराव जोगल २३] पांडूरंग धोंडू धाडवे २४] गोपाळ चिमाजी कोरडे २५] पांडूरंग बाबाजी जाधव २६] बाबू हरी दाते २७] अनुप माहावीर २८] विनायक पांचाळ २९] सिताराम गणपत म्हादे ३०] सुभाष भिवा बोरकर ३१] गणपत रामा तानकर ३२] सिताराम गयादीन ३३] गोरखनाथ रावजी जगताप ३४] महमद अली ३५] तुळशीराम पुंजाजी बेलसरे ३६] देवाजी सखाराम पाटील ३७] शामलाल जेठानंद ३८] सदाशिव महादेव भोसले ३९] भिकाजी पांडूरंग रंगाटे ४०] वासुदेव सुर्याजी मांजरेकर ४१] भिकाजी बाबू बांबरकर ४२] सखाराम श्रीपत ढमाले ४३] नरेंद्र नारायण प्रधान ४४] शंकर गोपाल कुष्टे ४५] दत्ताराम कृष्णा सावंत ४६] बबन बापू भरगुडे ४७] विष्णू सखाराम बने ४८] सिताराम धोंडू राडये ४९] तुकाराम धोंडू शिंदे ५०] विठ्ठल गंगाराम मोरे ५१] रामा लखन विंदा ५२] एडवीन आमब्रोझ साळवी ५३] बाबा महादू सावंत ५४] वसंत द्वारकानाथ कन्याळकर ५५] विठ्ठल दौलत साळुंखे ५६] रामनाथ पांडूरंग अमृते ५७] परशुराम अंबाजी देसाई ५८] घनश्याम बाबू कोलार ५९] धोंडू रामकृष्ण सुतार ६०] मुनीमजी बलदेव पांडे ६१] मारुती विठोबा म्हस्के ६२] भाऊ कोंडीबा भास्कर ६३] धोंडो राघो पुजारी ६४] ह्रुदयसिंग दारजेसिंग ६५] पांडू माहादू अवरीरकर ६६] शंकर विठोबा राणे ६७] विजयकुमार सदाशिव भडेकर ६८] कृष्णाजी गणू शिंदे ६९] रामचंद्र विठ्ठल चौगुले ७०] धोंडू भागू जाधव ७१] रघुनाथ सखाराम बीनगुडे ७२] काशीनाथ गोविंद चिंदरकर ७३] करपैया किरमल देवेंद्र ७४] चुलाराम मुंबराज ७५] बालमोहन ७६] अनंता ७७] गंगाराम विष्णू गुरव ७८] रत्नु गोंदिवरे ७९] सय्यद कासम ८०] भिकाजी दाजी ८१] अनंत गोलतकर ८२] किसन वीरकर ८३] सुखलाल रामलाल बंसकर ८४] पांडूरंग विष्णू वाळके ८५] फुलवरी मगरु ८६] गुलाब कृष्णा खवळे ८७] बाबूराव देवदास पाटील ८८] लक्ष्मण नरहरी थोरात ८९] ठमाबाई विठ्ठल सूर्यभान ९०] गणपत रामा भुते ९१] मुनशी वझीऱअली ९२] दौलतराम मथुरादास ९३] विठ्ठल नारायण चव्हाण ९४] देवजी शिवन राठोड ९५] रावजीभाई डोसाभाई पटेल ९६] होरमसजी करसेटजी ९७] गिरधर हेमचंद लोहार ९८] सत्तू खंडू वाईकर ९९] गणपत श्रीधर जोशी १००] माधव राजाराम तुरे(बेलदार) १०१] मारुती बेन्नाळकर १०२] मधूकर बापू बांदेकर १०३] लक्ष्मण गोविंद गावडे १०४] महादेव बारीगडी १०५] कमलाबाई मोहिते.

📮 मदर डे च्या हार्दिक शुभेच्छा संदेश व इतिहास

जागतिक कामगार दिन  मराठी माहिती :-

दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिन आहे. दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो. तसेच १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणूनही महाराष्ट्रात साजरा केला जातो.
कामगार दिन कसा सुरू झाला?

औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव करण्यात आला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१पासून १ मे हा कामगारदिन पाळण्यात येतो.
कामगारांच्या प्रमुख मागण्या कोणत्या होत्या :-
१. कायद्याने ८ तासांचा दिवस
२. लहान मुलांना कामाला लावण्यावर बंदी
३. महिला कामगारांच्या कामावर मर्यादा
४. रात्रीचे काम व धोक्याचे काम यासाठी खास नियम
५. कायद्याने साप्ताहिक सुट्टी
६. कामाचा मोबदला वस्तुच्या रूपात न देता नगद द्यावा.
७. समान कामासाठी समान वेतन आणि संपूर्ण संघटना स्वातंत्र्य. कामगारांच्या प्रमुख माग
्या होत्या
देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात कामगारदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी जगातील ८0 देशांमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते. कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणार्‍या कामगारांचा गौरव करण्यात येतो.
अनेक वर्षानंतर अधिकाधिक देशांतले कामगार १ मे दीनाच्या सोहळ्यात सामील होत गेले आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार १ मे दिन साजरा करु लागले. १ मे दिवस आंरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार १ मे दिवसात होऊ लागला. १ मे दिवस ही सगळ्या कामगार चळवळीची परंपरा झाली. १९०५ च्या १ मे या दिवसासाठी लेनिनने लिहिलेल्या पत्रकात म्हटले होते, “कामगाराकामगारात, राष्ट्राराष्ट्रात, धर्माधर्मात असणारे शत्रुत्व नष्ट करा. या शत्रुत्वाने फक्त लुटारूंचा आणि जुलूमशहांचाच फायदा होतो, कारण ते कामगारवर्गातील अज्ञातावर आणि दुफळीवरच जगत असतात. ज्यू आणि ख्रिश्चन, फिन आणि स्वीडश, आर्मेनियन आणि तातार, पोलिश आणि रशियन, ल्याटिन आणि जर्मन सारे भेदभाव विसरून समाजवादाच्या एका झेंडयाखाली आपण सारे आगेकूच करूया. सर्व देशातील कामगारांची ही ऐक्यशक्ती, आंतरराष्ट्रीय समाजवादाची संघशक्ती, १ मे दिनाला आपल्या दलांची पाहणी करते आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यासाठीचा लढा निर्धाराने आणि अविचलपणे पुढे नेण्यासाठी आपले बल संघटीत करते.”
वर्षे लोटली तशतशा अधिकाधिक देशांतल्या तुकडया १ मे दिनाच्या सोहळ्यात सामील होत गेल्या आणि कामगार वर्गाच्या आंतरराष्ट्रीय ऐक्याचा विस्तार वाढत गेला. औद्योगिक राष्ट्रांतील कामगारांच्या जोडीला वसाहती देशातील शहरामध्ये लाखो कामगार १ मे दिवस साजरा करु लागले आणि १ मे दिवस आंरराष्ट्रीय ऐक्याचे, स्वातंत्र्याचे मानवाकडून होणा-या मानवाच्या पिळवणूकीचा अंत करण्याचा प्रतीक बनला. साम्राज्यवादी भांडवलदारी व्यवस्थेच्या निषेधाचा अत्यंत व्यापक आविष्कार १ मे दिनात होऊ लागला. १ मे दिवस ही सर्व कामगार चळवळीची परंपरा झाली.
भारतातील पहिला कामगार दिन :-

भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.


Post a Comment

3 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad