Type Here to Get Search Results !

होळी सण मराठी माहिती ,होळी मराठी निबंध ,होळी शायरी ,SMS,रंगपंचमी मराठी माहिती ,सूत्रसंचालन .

होळी सण मराठी माहिती ,होळी मराठी निबंध ,होळी शायरी ,SMS,रंगपंचमी मराठी माहिती ,सूत्रसंचालन .

होळी विषयी : 


होळी वसंत ऋतु मध्ये साजरा केला जाणारा एक महत्वाचा भारतीय आणि नेपाळी लोकांचा सण आहे. हा सण हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. रंगांच्या या सणाला परंपरागतपणे दोन दिवस साजरा करतात. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धूलिवंदन असे म्हटले जाते.
 या दिवशी सर्व लोक आपले जुने राग रोष विसरून एकमेकांना रंग, गुलाल लावतात. लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उस्तुकता असते.
भारतातल्या वेगवेगळ्या भागांत फाल्गुन पौर्णिमेला एक लोकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. ह्या उत्सवाला “होलिकादहन” किंवा “होळी”, “शिमगा”, “हुताशनी महोत्सव”, “दोलायात्रा”, “कामदहन” अशा वेगवेगळ्या व्याख्या आहेत. ह्या लोकोत्सवाला “फाल्गुनोत्सव”, आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त “वसंतागमनोत्सव” किंवा “वसंतोत्सव” असेही म्हणण्यात येते. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती ‘बोंबा’ मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो

होळीचे महत्त्व :

होळी मनुष्याला मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी अशी कल्पना आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. होळीच्या दुसऱ्या दिवशी वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो. यात वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे. पण या हल्लीच्या काळात किमती लाकडे जाळून होळी साजरी करतात . दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला धुळवड असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. होळीचे मानसिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. लोकांच्या मनात बऱ्याच प्रकारचे मनोविकार लपलेले असतात. ते समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होऊ शकत नाहीत. होळीच्या दुसऱ्या दिवशी ते सगळे बाहेर काढण्याची संधी असते. होळीच्या दिवशी शिव्या देणे हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे.
होळीच दुसरं नांव म्हणजे हुताशनी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो.
होळी आली की होळीसाठी लाकडं गवऱ्या गोळा करणारी पोरं गल्ली बोळातून गात सुटतात.
"होळी रे होळी पुरणाची पोळी" ..
किंवा
"होळीला गवऱ्या पाच पाच... डोक्यावर नाच नाच".
लाकडं गवऱ्या गोळा केली जातात. मग घराच्या अंगणांत किंवा चौकात एक मोठी एरंडाची फांदी उभी करतात. त्याच्या भोवती लाकडं गोवऱ्या रचतात. संध्याकाळ झाली की होळी पेटवतात. सवाष्णी. मुलं-मुली, मोठी माणसं सर्वजण ह्या होळीची पूजा करतात. होळीला पुरण पोळीचा नैवेद्य दाखवतात. जे जुनं आहे, कालबाह्य आहे, अमंगल आहे त्या सर्वांचा जाळून नाश करायचा. नव्याचा चांगल्याचा उदात्ततेचा स्विकार करायचा हाच होळीचा खरा संदेश आहे.

होळीची पूजा कशी करावी : 

देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवावी. दिवसा होळी पेटवू नये. शक्यतो ग्रामदेवतेसमोर होळी उभी करावी. सर्वप्रथम मध्ये एरंड, माड, पोफळी अथवा ऊस उभा करावा. नंतर त्याच्या भोवती गोवर्‍या व लाकडे रचावीत. व्रतकर्त्याने स्नान करून संकल्प करावा. नंतर `होलिकायै नम: ।’ हा मंत्र म्हणून होळी पेटवावी. होळीची प्रार्थना करावी. होळी पेटल्यावर होळीला प्रदक्षिणा घालून शंखध्वनी करावा. होळी पूर्ण जळाल्यानंतर दूध व तूप शिंपून ती शांत करावी. नंतर जमलेल्यांना नारळ, पपनस यांसारखी फळे वाटावीत. दुसर्‍या दिवशी पहाटे होळीच्या राखेची पूजा करून ती राख अंगाला लावून स्नान करावे, म्हणजे मानसिक व्यथा, चिंता व रोग होत नाहीत. काही ठिकाणी फाल्गुन वद्य पंचमीला गुलाल व रंग उडवून व एकमेकांना लावून `रंगपंचमी’ उत्सव साजरा करतात.

होळीचा इतिहास कथा : 


ह्या सणाविषयी अनेक कथा जोडलेल्या आहेत. होळीच्या दिवशी रात्री होळी जाळली जाते या मागे एक आख्यायिका आहे.
राजा हिरण्यकश्यप हा स्वतःला देव समजत असे, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. राजाने भक्त प्रल्हाद ला विश्णु भक्ती करण्यापासून थांबवण्याचा प्रयन्त केला , पण प्रळाडणे नकार दिल्यानंतर राजाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला.

शेवटी राजाने प्रल्हादला मारण्यासाठी बहिण होळीका ची मदत घेतली. होळीकाला अग्नीत न जळण्याचे वरदान प्राप्त होते. राजाच्या सांगण्यावरून प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवून अग्नीत प्रवेश केला. परंतु विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचले आणि होळीका भस्म झाली. 

या कथेमधून हा संकेत मिळतो कि वाईटावर चांगल्याच विजय होतोच. आजतागायत फाल्गुन पौर्णिमेला होळी जाळली जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. हा एक रंगाचा सण आहे.

होळी ला घ्यायची काही काळजी:

१) होळी हा रंगांचा सण आहे परंतु सावधानता पाळणे अधिक गरजेचे आहे. कारण आजकाल मिळावटवाल्या रंगामुळे खूप नुकसानाना सामोरे जावे लागते. त्यामुळे गुलालाने होळी खेळणे जास्त सोयीस्कर आहे.
२) तसेच आजकाल भांग मध्ये देखील बरेच अन्य नाशिले पदार्थ मिसळले जातात त्यामुळे अश्या पदार्थापासून सावध राहणे गरजेचे आहे.
३) चुकीच्या रंगामुळे डोळ्यांना हानी पोहचू शकते त्यामुळे असे रसायन मिसळले रंग वापरू नये.
४) घराबाहेर बनवलेली कोणतीही वस्तू खाण्या अगोदर विचार करावा कारण अश्या सणांना मिळावट होण्याची अधिक शक्यता असते.
५) सावधानतेने एकमेकांना रंग लावावे. कोणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्ती रंग लावू नये. आजकाल होळी सारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण वाढले आहे.
होळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे आणि तो तसाच साजरा करावा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad