Type Here to Get Search Results !

सावित्रीबाई फुले यांची एक फार छान कविता

सावित्रीबाई फुले यांची एक फार छान कविता


सावित्रीबाई फुले यांची एक फार छान कविता...
तयास मानव म्हणावे का?
ज्ञान नाही विद्या नाही
ते घेणेची गोडी नाही
बुद्धी असुनि चालत नाही
तयास मानव म्हणावे का?
दे रे हरी पलंगी काही
पशूही एेसे बोलत नाही
विचार ना आचार नाही
तयास मानव म्हणावे का?
पोरे घरात कमी नाहीत
तयांच्या खाण्यासाठीही
ना करी तो उद्योग काही
तयास मानव म्हणावे का?
सहानुभूती मिळत नाही
मदत न मिळे कोणाचीही
पर्वा न करी कशाचीही
तयास मानव म्हणावे का?
दुसऱ्यास मदत नाही
सेवा त्याग दया माया नाही
जयापाशी सदगुण नाही
तयास मानव म्हणावे का?
ज्योतिष रमल सामुद्रीकही
स्वर्ग नरकाच्या कल्पनाही
पशुत नाही त्या जो पाही
तयास मानव म्हणावे का?
बाईल काम करीत राही
एेतोबा हा खात राही
पशू पक्षात एेसे नाही
तयास मानव म्हणावे का?
पशु-पक्षी माकड माणुसही
जन्ममृत्यु सर्वा नाही
याचे ज्ञान जराही नाही
तयास मानव म्हणावे का?

⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪

🚩 10 मार्च - सावित्रीबाई फुले पुण्यतिथी मराठी भाषण !

➡️ https://www.marathibhashan.com/2020/07/savitribai-fule-marathi-bhashan.html?m=1
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️


(सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त!)

माझ्या सावू चा गं आज, असे जन्मदिन|
आज पोरीला या तुझ्या, वाटे अभिमान||

हाल अपेष्टा अपार, सोसल्या तू आई|
आम्ही मुलींनी करावी, कशी त्याची भरपाई?

शेन- दग डांचे वर्षाव, झेललेस अंगावर|
पण, जिद्दीपुढे तुझ्या, त्यांचे हरले प्रहार||

जोतिबाच्या संगे, उभी सावू कणखर|
तुम्हा दोघांच्या कारणे, आज मान माझी वर||

आई, तू एक ज्वाला , तलवार तळपती|
शक्ति लेखणिची, माझ्या दिलीस तू हाती||

आई, तुझ्या स्वप्नान्परी, मी शिकेन गं फार!
अभी राहीन गं ताठ, घेईन जग खांद्यावर||

⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪


होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....
एरव्ही बोललेही नसते,
पण माझ्या विचारांचे
तुम्ही घोटून घोटून क्रिम केलेय.
चक्क माझी देवी बनवून
मला फोटोमध्ये फ्रेम केलेय.

जमेल तेंव्हा,जमेल तसे
माझे सोईनुसार कौतुक करता.
खरे दु:ख याचे की,
तुम्ही मला गृहित धरता.
त्याचा राग मी तुमच्यासमोर खोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....

कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ व्हावा,
सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्यात.
ज्या माझ्या वारसा सांगतात,
त्याच बेईमान झाल्यात.
असे होईल,मला काय माहित?
मला कुठे पुढचे दिसले होते?
एका वेगळ्या जगासाठी
मी शिव्याशाप,
दगडाबरोबर शेणही सोसले होते.
तुमच्याच शब्दात सांगायचे तर
रात्रंदिवस घासले होते.
आज मी कसले घाव झेलतेय?
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय....

ही काही उपकाराची भाषा नाही.
आजच्या बाजारू समाजसेवेसारखा
हा बेंडबाजा अगर ताशा नाही.
मी विसरून गेले होते,
आम्ही कोणकोणते विष पचवले आहे.
हल्ली मात्र तुम्ही 
आमच्या आत्मसन्माला डिचवले आहे.
म्हनूनच तुमच्या बहिर्‍या कानी
हे गार्‍हाणे घालतेय.
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

माय मावल्यांनो,लेकीबाळींनो.
तुम्ही शिकलात सवरलात.
पण नको तेवढ्या शहाण्या झालात.
विकृत स्त्रीमुक्तीच्या
प्रत्येकजणी कहाण्या झालात.
माझा वारसा सांगून,
स्वार्थासाठी राबता आहात.
या सगळ्या संतापापुढे
आज मी भिड्भाड भुलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

बाईपणाचे दु:ख काय असते?
मी तुमच्यापेक्षा जास्त भोगलेय.
आरशात पाहून सांगा,
मी सावित्रीच्या शब्दाला जागलेय?
तकलादू आणि भंपक
स्त्रीमुक्तेची नशा
तुम्हांला आज चढली आहे.
कपडे बदलेले की,
पुरोगामी होता येते,
ही फॅशन तुम्ही पाडली आहे.
शिकली सवरलेली माझी लेक
संस्कृतीच्या नावाखाली
नाकाने कांदे सोलतेय..
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

मान नको,पान नको,
आमचे उपकारही फेडू नका.
किर्तन-बिर्तन काही नको
झोडायची म्हनून
भाषणंही झोडू नका.
वाघिणीचे दूध पिऊन
कुत्र्यांसारखा गोंडा घोळीत आहात.
धर्म-संस्काराच्या नावाखाली
टाकाऊ परंपरा पाळीत आहात.
तुमच्या चिपाडलेल्या डोळ्यात
म्हनूनच हे अंजन घालतेय...
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

तुम्हांला आज 
काहीसुद्धा सोसायचे नाही.
काढणारे काढीत आहेत
तुम्हांला शाळा काढीत बसायचे नाही.
तुम्ही फक्त पुरोगामित्त्वाचा 
खरा वसा घ्यायला पाहिजे.
एखादा दुसरा ’यशवंत’ शोधून
त्याला आधार द्यायला पाहिजे,
शाळा कॉलेजचे पिक तर
हायब्रिडसारखे डोलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

मनमानी आणि स्वैराचाराला
पुरोगामित्त्वाचे लेबल लावणे,
यासारखी दुसरी सोपी युक्ती नाही.
फक्त नवरे बदलणे,
घटस्फोट घेणे,
ही काही स्त्रीमुक्ती नाही.
माझी खरी लेक तीच,
जी सत्यापूढे झुकत नाही.
सावित्री आणि ज्योतिबांपूढे
आंधळेपणाने माथा टेकत नाही.
माझी खरी लेक तीच,
आम्हांलासुद्धा नव्याने तपासून
स्वत:ची भाषा बोलतेय.
आमचाही वसा
तावून-सुलाखुन पेलतेय.....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय.....

आमच्याच मातीत,
आमच्याच लेकरांकडून
दूजाभाव बघावा लागला.
माझा फोटो लावण्यासाठीही
सरकारी जी.आर.निघावा लागला.
आपल्या सोईचे नसले की,
विचारांकडेही कानाडॊळा होतो.
समाजासाठी काही करायचे म्हटले की,
पोटात प्लेगचा गोळा येतो.

ज्योतिबांशिवाय सावित्री,
सावित्रीशिवाय ज्योतिबा,
समजून घेता येणार नाही.
विचारांची ही ज्योती,
एकटी-एकटी नेता येणार नाही.
सुनांना लागावे म्हणून तर
लेकींनो, तुम्हांला बोलतेय....
होय,मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय...

⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪
🚩 10 मार्च - सावित्रीबाई फुले पुण्यतिथी मराठी भाषण !

➡️ https://www.marathibhashan.com/2020/07/savitribai-fule-marathi-bhashan.html?m=1
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪

"माझी माय सावित्री...!"

माझी माय सावित्री होती लय
हो धिराची....
लेकिबाळी शिकवाया पर्वा केली ना घराची....
सदा धन्याच्या पाठीशी उभी पदर
... खोचुन...
किती केलं रे सहन...
कधी गेली ना खचुन...
तिनं घडविली क्रांती...
स्वतः अआई शिकून...
डगमगली कधी ना..
गोळे शेणाचे झेलून...
"ज्योतिने" ज्योत पेटली..
सावित्री झाली वात..
रात काळोख भेदाया..
केली तिने सुरुवात...!
(अर्घ्यदान मधून)
महेँद्र कांबळे.
माता सावित्रीबाई फुले
जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा.
Mahendra Gautam 

⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪⧪

________________________________________

🚩 10 मार्च - सावित्रीबाई फुले पुण्यतिथी मराठी भाषण !

➡️ https://www.marathibhashan.com/2020/07/savitribai-fule-marathi-bhashan.html?m=1
________________________________________ 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad