Type Here to Get Search Results !

19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती मराठी माहिती निबंध सूत्रसंचालन .

19 नोव्हेंबर इंदिरा गांधी जयंती मराठी माहिती निबंध सूत्रसंचालन .




जन्म १९ नोहेंबर  १९१७ —  मृत्यू ३१ आक्टोंबर १९८४

कणाकणाने ज्योत जळाली, उजळीत तेजोधन |
ज्यास द्याया शितलतेपन , झिजले हे चंदन ||

    भारता सारख्या खंड्प्राय देश्याच्या दीर्घकाळ राहिलेल्या एकमेव नेता म्हणजेच पंतप्रधान म्हणून त्या होत श्रीमती इंदिरा गांधी. स्वातंत्र्य चळवळीत झोकून देणारी आणि देश स्वतंत्र्य झाल्यावर त्याच्या विकासासाठी अविरत झटणारी त्यांच्या सारखी स्त्री पंतप्रधान तर शोधूनही मिळायची नाही.  १९ नोहेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला. आई कमला आणि वडील पंडीत जवाहरलाल नेहरू. यांच्या कडून विविध उत्तम गोष्टींचे बाळकडू त्यांना जन्म: मिळाले. “आनंद भवन” यां वास्तूत त्यांच्या जन्माने एक चैतन्य पसरले. स्वातंत्र्य आंदोलनातील नेते मोतीलालजी नेहरू त्यांच्या पत्नी स्वरुपारांनी या आजी-आजोबांना पण अतिशय आनंद झाला.  इंदिरा जींना ‘इंदिरा’ हे नाव आजी -आजोबां कडून मिळाले. पण नेहरू त्यांना ”प्रियदर्शनी” म्हणून बोलवायचे. लहानपणा पासून ‘स्वदेशी’ आणि “स्वदेश” यांचे प्रेम त्यांच्या मनात निर्माण झाले होते. एकदा त्यांच्याकडे विलायतेहून आलेल्या पाहुण्यांनी एक सुंदर गुलाबी फ्रॉक  त्यांना आणला होता. पण तो फ़्रॉक खोलीतल्या एकां कोपर्यात ठेवून त्या त्यांच्या कडे एकटक पाहात बसल्या आईंनी तो फ़्रॉक घालण्यास आग्रह केला, ‘ तेव्हा मी विदेशी कपडे परिधान करणार नाही !’ असे ठासून त्यांनी आईला सांगितले. आपली विदेशी खेळणी, कपडे त्यांनी विदेशी कपड्यांच्या होळीत टाकून दिले.

💥  SHRIMATI INDIRA GANDHI ENGLISH EASSY





वयाच्या तेराव्या वर्षी म्हणजे १९३० साली त्यांनी आपल्या सवंगड्यांची वानरसेना स्थापन करून नेत्यांचे संदेश पोचवण्याचे काम केले. ब्रिटिशां विरुद्ध मिरवणुका काढल्या, घोषना दिल्या, या सर्व गोष्टीबरोबर शिक्षणही चालूच ठेवले. प्रारंभी. अलाहाबाद, मग पुणे व नंतर रविंद्रनाथांच्या शांती निकेतन मध्ये त्यांनी शिक्षण घेतले. शांतीनिकेतनातल्या मुक्त वातावरणात त्या विशाल बनल्या. कष्ट, स्वावलंबनाच्या जोरावर त्यांनी विविध कलाही आत्मसात केल्या. नृत्याच्या कलेतील त्यांच्या यश्याचे तर खुद रविंद्रनाथ टागोरांनी कौतुक केले होते.  शांतीनिकेतनाच्या कला पथकातून भारतभ्रमण करायला त्या उत्सुक होत्या, पण त्यांना  त्यांच्या आईच्या सुश्रुषेसाठी त्यांना स्वित्झरलंड ला जावे लागले. आणि त्यांची भारत भ्रमणाची संधी हुकली.
स्वातंत्र आंदोलनातील प्रमुख नेते असल्यामुळे त्यांचे वडील नेहरू बर्याच वेळी तुरुंगात असायचे. आईचे आजारपण  तर ब्लाव्तच चालले होते. पण त्याही प्रसंगात त्या ठामपणे उभ्या राहिल्यात, १८ फेब्रुवारी १९३६ रोजी कमलाजींचे निधन झाले.  तेव्हा त्यांच्यावर खूप मोठा आघात झाला.वडिलांनी त्यांना पुन्हा शांतीनिकेतन मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. पण फिरोज गांधी नेहरू घराण्यातील परिचित असलेल्या हुश्यार अन उमद्या तरुणाच्या सांगण्या वरून त्यांना  ‘ ऑक्सफ्रर्ड ‘ मध्ये दाखल करण्यात आले.
या काळात पंडीतजिनी इंदिराजींना जी पत्र पाठविली त्याद्वारे त्यांना सम्बन्ध भारताच्या ईतिहासाची पुरेपूर जाणीव झाली. याच काळात हिटलर ने इंग्रजवर हल्ले चढवायला प्रारंभ केला. वातावरण चिघळत चालले,म्हणून विमानाने एकट्या इंदिराजी भारतात परत आल्या त्यांच्या साहसाचे सार्यांनी कौतुक केले.  मागोमाग फिरोज गांधीही भारतात आले.आणि येथील राजकारणात सक्रीय झाले. विजयालक्ष्मी कृष्णा या आत्यांचा विरोध असतानाही इंदिराजीनचा २६ फेब्रुवारी १९४२ रोजी फिरोज गांधी यांच्याशी त्यांचा विवाह  झाला. फिरोज गांधी व इंदिराजी यांनी या देशाच्या चळवळीत मोठे योगदान दिले. एका मिरवणुकीत ब्रिटीश सोजिरांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर लाठीमार केला. पण त्यात अग्रभागी इंदिराजी होत्या. त्यांनाही मार लागला. पण त्यांनी तिरंगा सोडला नाही, व तो खालीही पडू दिला नाही. उलट स्त्रियांवर लाठीमार करणार्या त्या अधिकार्याला त्या म्हणाल्या “मी नेहरूजी कि कन्या हुं, मै डरुंगी नही, मै चिल्लाउंगी नही, अपना तिरंगा झेंडा छोडुंगी नही।” अश्या अनेक शोर्याच्या गोष्टी सांगता येतील.
राजीव आणि संजीव या दोन देखण्या मुलांना वाढवत त्यांनी एकीकडे संसाराचा गाडा ओढला. १९५९ साली त्या काँग्रेस च्या अध्यक्षा म्हणून निवडल्या गेल्या. त्यांनी प्रचंड कामे केली. संघटण मजबूत केले. १९६० ला यांच्या पती फिरोज गांधी यांचे निधन झाले. १९६४ साली पंडीत जवाहरलालजींचे निधन झाले. आघातंवर आघात होत असतानाही त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या.लालबहाद्दूर शास्त्रींच्या मंत्रीमंडळात त्यांनी नभोवाणी मंत्री मंडळाचा कारभार नेटकेपणाने सांभाळला आणि शास्त्रीजीच्या मृत्यूनंतर २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ पर्यंत देश्याच्या पहिल्या पंतप्रधान म्हनून त्यांनी मोठी भूमिका बजावली. त्यांनी गरिबी ह्टवन्या करीता प्रथम दहाकलमी कार्यक्रम राबविला. सतत भारतावर आक्रमण करणार्या पाकीस्थांनच्या पूर्व बंगाल मधील गांजलेल्या प्रजेला स्वतंत्र करण्या साठी लष्करी मदत करून त्यांनी भारत द्वेष्ट्या पाकीस्थांनचे ‘ बांगला देश ‘व ‘पाकीस्थांन ‘ असे दोन तुकडे केले. त्यांनी असामान्य कामगिरीलक्षात घेऊन राष्ट्रपतींनि  त्यांना १९७१ मध्ये ” भारतरत्न ” किताबाने सन्मानित केले.
सततचे संप व टाळेबंदी या मुळे देश्याची बिघडू लागलेली अर्थ व्यवस्था ताळ्यावर आणण्याच्या हेतूने त्यांनी १९७५ मध्ये ‘ ‘आणीबाणी ‘ पुकारली.पण भारतातील लोकशाही प्रेमी जनता त्यामुळे नाराज झाली. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला हार खावी लागून ‘ जनता पक्ष्या ‘ च्या हाती सत्ता गेली.पण त्या पक्षाचे घटक पक्ष आपापसात भांडू लागल्याने १९८० च्या निवडणुकीत कॉंग्रेसने दैदिप्तमान विजय मिळविला. व इंदिराजी पुन्हा १४ जानेवारी १९८० ते ३१ आक्टोंबर १९८४ पर्यंत पंतप्रधान झाल्या . त्यांनी गरिबांच्या उद्धारासाठी जश्या योजना कार्यान्वित केल्या,त्याच प्रमाणे भारतीय वैज्ञांनिकान कडून अवकाश्यात  उपग्रह सोडून जगात भारताचा दबदबा निर्माण केला.
३०  आक्टोंबर १९८४ रोजी त्यांनी केलेल्या एका भाषणात त्या म्हणाल्या होत्या, ” माझ्या देश्याची सेवा करताना मला मृत्यू आला. तर मला त्याचा अभिमानच वाटेल माझ्या रक्ताचा थेंब अन थेंब मी या देश्याच्या वैभवासाठी आणि विकासासाठी खर्च करीन,आणि हा देश बलवान व चैतन्यदायी बनवेन.” ३१ आक्टोंबर १९८४ रोजी सकाळी काळाने त्यांच्या वर क्रूर हल्ला केला. त्यांच्याच अंगरक्षकाने त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करून त्यांची हत्या केली. एक थोर साहसी स्री, अखेर हुतात्मा झाली.पहिला गांधी प्रार्थनेच्या वेळी तर दुसर्या गांधी देशसेवेसाठी बाहेर पडताना गेल्या. हेच या देश्याचे दुर्दैव होय. एक तेजपुंज व्यक्तिमत्व लोप पावले. सारा भारत सुन्न झाला. जग यां घटणेने अचंबित झाले. त्या गेल्या पण त्यांचे उत्तुंग व्यक्तिमत्व आजही भारतीयांच्या मनावर कोरलेले आहे.त्यांच्या स्मुतीला आम्हां सर्वाचे  शतश: प्रणाम !

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad