Type Here to Get Search Results !

१५ ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन - ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती – Dr. APJ Abdul Kalam Information In Marathi

वाचन प्रेरणा दिन - ए.पी.जे. अब्दुल कलाम मराठी माहिती – Vachan Prerna din  Dr. APJ Abdul Kalam Information In Marathi.


Dr. APJ Abdul Kalam

पूर्ण नाव : अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
जन्म  : १५ ऑक्टोबर १९३१, रामेश्वर
नागरिकत्व : भारतीय
राष्ट्रीयत्व : भारतीय
धर्म : मुस्लीम
पुरस्कार : पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘भारतरत्न
वडील : जैनुलाबदिन अब्दुल

अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम (तमिळ: அவுல் பகீர் ஜைனுலாப்தீன் அப்துல் கலாம்) (जन्म ऑक्टोबर १५, १९३१, तमिळनाडू, भारत) यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती (कार्यकाळ २५ जुलै, इ.स. २००२ ते २५ जुलै, इ.स. २००७) होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.

⧭ वाचन प्रेरणा दिन अप्रतिम भाषण , निबंध संग्रह



⧭ वाचन प्रेरणा दिन सूत्रसंचालन - आशिष देशपांडे सरांचे


⧭ वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता , DR.A.P.J.ABDUL KALAM WHATSAPP MSG


■ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम  शिक्षण : 


त्यांचे वडील रामेश्वरमला येणाऱ्या यात्रेकरूंना होडीतून धनुष्कोडीला नेण्याआणण्याचा व्यवसाय करीत. डॉ. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम्‌ला पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉ. कलाम गावात वर्तमानपत्रे विकून, तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवीत व घरी मदत करीत. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे बी.एस्‌‍सी. झाल्यानंतर त्यांनी ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरॉनॉटिक्सचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर, त्यांनी अमेरिकेतील ‘नासा’ या प्रसिद्ध संशोधन संस्थेत चार महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले.

त्यानंतर अब्दुल कलाम यांचा १९५८ ते ६३ या काळात संरक्षण संशोधन व विकास संस्थेशी(DRDO) संबंध आला.

■ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम कार्य


१९६३ मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) क्षेपणास्त्र विकासातील एसएलव्ही(सेटेलाइट लॉन्चिंग व्हेईकल) च्या संशोधनात भाग घेऊ लागले.इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला त्या वेळी डॉ. कलाम पुन्हा डीआरडीओमध्ये आले.

स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करण्याची त्यांची जिद्द तेव्हापासूनचीच आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रोमध्ये) असताना सॅटेलाईट लाँन्चिंग व्हेईकल -३ या प्रकल्पाचे ते प्रमुख झाले. साराभाईनी भारतात विज्ञान तंत्रज्ञानाची आघाडी डॉ. कलाम यांनी सांभाळावी, असे वक्तव्य केले होते, ते पुढे कलामांनी सार्थ करून दाखविले. साराभाईंचेच नाव दिलेल्या ‘विक्रम साराभाई अवकाश केंद्रा’चे ते प्रमुख झाले.

वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असतो व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. क्षेपणास्त्र विकासकार्यामधील ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करतांना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व डीआरडीओ चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एलसीए) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.

विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे आहेत. त्यांना रुद्रवीणा वाजण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद आहे. भारत सरकारने ‘पद्मभूषण’, ‘पद्यविभूषण’ व १९९८ मध्ये ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉ. कलाम हे अविवाहित आहेत व पूर्ण शाकाहारी आहेत. पुढील वीस वर्षांत होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते पाहतात. बालपण अथक परिश्रमांत व्यतीत करून विद्येची अखंड साधना करीत खडतर आयुष्य जगलेले, आणि जगातील सर्वात मोठया लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. कलाम, हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्त्व आहे.

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम

■ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची कारकीर्द : 


जन्म : १५ ऑक्टोबर १९३१ रामेश्वर येथे.
शिक्षण : श्वात्र्झ(?) हायस्कूल, रामनाथपुरम. सेंट जोसेफ कॉलेज, त्रिचनापल्ली येथे विज्ञान शाखेतील पदवी(१९५४). नंतर चेन्नई येथून एरोनॉटिकल इंजिनियरिंगची पदविका घेतली(१९६०).
१९५८ : डी.आर.डी.ओ.मध्ये सीनियर सायंटिस्ट. तेथे असताना प्रोटोटाईप हॉवरक्रॉफ्ट (हॉवरक्राफ्टचे कामचलाऊ मॉडेल) तयार केले. हैद्राबादच्या डी.आर.डी.ओ.(डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन)चे संचालकपद.
१९६२ : बंगलोरमध्ये असताना भारतीय अवकाश कार्यक्रमात सहभागी. एरोडायनॅमिक्स डिझाइनच्या फायबर रीएनफोर्स्ड प्लास्टिक (FRP) या प्रकल्पात सहभागी.
१९६३ ते ७१ :विक्रम साराभाई यांच्याबरोबर काम केले. तिरुअनंतपुरम (त्रिवेंद्रम) येथील विक्रम साराभाई स्पेस रिसर्च सेंटर(ISRO) येथे सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल(SLV) प्रोग्रॅमचे प्रमुख.
१९७८ ते ८६ : प्रा. सतीश धवन यांच्याबरोबर काम.
१९७९ : SLVच्या उड्डाण कार्यक्रमाचे संचालक
१९७९ ते ८० : थुंबा येथे एसएलव्ही-३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर. (जुलै १९८० अवकाशात रोहिणी हा कृत्रिम उपग्रह प्रक्षेपित)
१९८१ : पद्मभूषण पुरस्कार प्राप्त
१९८५ : त्रिशूल या अग्निबाणाची निर्मिती.
१९८८ : पृथ्वी अग्निबाणाची निर्मिती. रिसर्च सेंटरची इमारत तयार करवली.
१९८९ : अग्नी या अग्निबाणाची निर्मिती.
१९९० : आकाश व नाग या अग्निबाणांची निर्मिती.
१९९१ : वैज्ञानिक सल्लागार, संरक्षण मंत्री डी. आर.डी. ओ. चे प्रमुख म्हणून त्यांनी अर्जुन हा एम.बी.टी.(मेन बॅटल टँक) हा रणगाडा व लाइट काँबॅट एअरक्राफ्ट (एल.सी.ए.) यांच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली.
१९९४ : ‘माय जर्नी ‘ हा कवितासंग्रह प्रकाशित.
२५ नोव्हें. १९९८ : भारतरत्‍न हा पुरस्कार प्राप्त.
२००१ : सेवेतून निवृत्त.
२००२ : भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमणूक.

मागील:
के.आर. नारायणन     भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, २००२ – जुलै २५, २००७     पुढील:
प्रतिभा पाटील

■ अब्दुल कलाम यांनी लिहिलेली पुस्तके :

अदम्य जिद्द (मराठी अनुवाद : सुप्रिया वकील)
इग्नाइटेड माइंड्‌स: अनलीशिंग द पॉवर विदिन इंडिया (’प्रज्वलित मने’ या नावाचा मराठी अनुवाद, अनुवादक : चंद्रशेखर मुरगुडकर)
‘इंडिया २०२०- ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम’ (इंग्रजी, सहलेखक अब्दुल कलाम आणि वाय.एस. राजन); ‘भारत २०२० : नव्या सहस्रकाचा भविष्यवेध’ या नावाने मराठी अनुवाद : अभय सदावर्ते)
इंडिया – माय-ड्रीम
एनव्हिजनिंग ॲन एम्पॉवर्ड नेशन : टेक्नालॉजी फॉर सोसायटल ट्रान्सफॉरमेशन
ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक व्यक्तिवेध (मराठी अनुवाद : माधुरी शानभाग)
विंग्ज ऑफ फायर (आत्मचरित्र). मराठीत अग्निपंख नावाने अनुवाद, अनुवादक :माधुरी शानभाग.
सायंटिस्ट टू प्रेसिडेंट (आत्मकथन)
टर्निंग पॉइंट्‌स (याच नावाचा मराठी अनुवाद : अंजनी नरवणे)
दीपस्तंभ (सहलेखक : अरुण तिवारी; मराठी अनुवाद कमलेश वालावलकर)

■ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यासंबंधी लिहिली गेलेली पुस्तके : 


इटर्नल क्वेस्ट : लाइफ ॲन्ड टाइम्स ऑफ डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक : एस.चंद्रा)
’डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम – एक मानवतावादी शास्त्रज्ञ.’ (हिंदी, मूळ लेखक अतुलेंद्रनाथ चतुर्वेदी; मराठी अनुवाद – मंदा आचार्य).
ए पी जे अब्दुल कलाम : द व्हिजनरी ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक : के. भूषण आणि जी. कात्याल)
प्रेसिडेंट एपीजे अब्दुल कलाम (इंग्रजी, लेखक :आर के पूर्ती)
रामेश्वरम ते राष्ट्रपतीभवन- डॉ. अब्दुल कलाम. (मराठी, लेखक : शां. ग. महाजन)

⧭ वाचन प्रेरणा दिन शायरी / चारोळी/कविता , DR.A.P.J.ABDUL KALAM WHATSAPP MSG



Post a Comment

1 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. वाचन प्रेरणा दिवस की हार्दिक शुभकामनाएं

    ReplyDelete

Top Post Ad

Below Post Ad