आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन मराठी माहिती ...
तो आप सिर्फ एक पुरुष को शिक्षित करते हैं;
लेकिन अगर आप एक स्त्री को शिक्षित करते हैं
तो आप एक पूरी पीढ़ी को शिक्षित करते हैं.
साक्षरतेचे महत्त्व कोणाला माहीत नाही? पण केवळ शिक्षण देणे म्हणजे साक्षरता नव्हे, तर मानवी प्रगतीच्या वाट्यात अडथळा बनण्याचा, गरिबीला नष्ट करण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तीशाली मार्ग आहे. जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलवण्यासाठी साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे.
जागतिक साक्षरता दिन इंतिहास
जागतिक साक्षरता दिन हा प्रतिवर्षी ८ सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास व त्यातून शांतता व सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणार्या युनेस्कोने शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक साक्षरता दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय ७ नोव्हेंबर इ.स. १९६५ रोजी झाला आणि ८ सप्टेंबर इ.स. १९६६ पासून जगभरात 'जागतिक साक्षरता दिन' साजरा केला जाऊ लागला.
अगर आप एक पुरुष को शिक्षित करते हैंतो आप सिर्फ एक पुरुष को शिक्षित करते हैं;
लेकिन अगर आप एक स्त्री को शिक्षित करते हैं
तो आप एक पूरी पीढ़ी को शिक्षित करते हैं.
शिक्षणाचे महत्त्व सकलजनांना पटवून देण्यासाठी या दिवशी विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले जातात. गरिबीचे उच्चाटन, बालमृत्यू, लोकसंख्या वाढ, स्त्रीपुरुष समानता, शांती आणि प्रजासत्ताक धोरण या समाज उन्नतीशी निगडीत बाबींच्या मुळाशी शिक्षण आहे व त्याचा प्रसार झाला तर अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात.
युनेस्कोच्या व्याख्येनुसार साक्षरता म्हणजे माणसाला दैनिक जीवनाशी निगडित बाबीविषयी लिहिता वाचता येणे, मानवी जीवनातील घडामोडींचे विश्लेषण करता येणे व वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून स्वत:च्या व समाजाच्या प्रगतीस हातभार लावणे.
दुदेर्वाची बाब अशी आहे की, जगभरात ७७ कोटींहून जास्त लोक शिक्षणाला वंचित झालेले आहेत. पाचपैकी एक प्रौढ निरक्षर आहे. त्यातील दोन तृतीयांश महिला आहेत. ७ कोटींपेक्षा जास्त मुले शिक्षणाला वंचित झालेली आहेत त्यातील बरीच मुले नियमित शाळेत जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना शाळा अर्धवट सोडावी लागते. जगातील ३५ देशांत तर साक्षरतेचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यात पुन्हा स्त्रियांचा वाटा दोन तृतीयांश आहे.
इ.स. २००० पासून राष्ट्रकुलाने चार कलमी कार्यक्रम हाती घेऊन निरक्षरतेवर मात करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत:
* सकलांना शिक्षण
* सहस्त्रकाच्या प्रगतीचे एक उद्दिष्ट
* राष्ट्रकुलाचे साक्षरता दशक
* राष्ट्रकुलाचे शिक्षण व प्रगतीचे एक सातत्य राखण्याचे दशक
या कार्यक्रमांतर्गत विविध देशाची सरकारे साक्षरता प्रसारासाठी कटीबद्ध झालेली आहेत.
आपल्याकडे केरळ राज्य सोडले तर अन्य ठिकाणी साक्षरतेबाबत आनंदच आहे. आपला देश साक्षर व्हावा असे वाटत असेल, तर प्रत्येक सुशिक्षित नागरिकाला या यज्ञकुंडात योगदान द्यावे लागेल. आपल्या अशिक्षित देशबांधवांना साक्षर करण्यासाठी सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी स्तरावर जे प्रयत्न चालू आहेत, त्यास प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लावणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य ठरते.
साक्षरता दिवस कविता
बहुत ज़रूरी होती शिक्षा,
सारे अवगुण धोती शिक्षा.
चाहे जितना पढ़ लें हम पर,
कभी न पूरी होती शिक्षा.
शिक्षा पाकर ही बनते हैं,
नेता, अफ़सर शिक्षक.
वैज्ञानिक, यंत्री व्यापारी,
या साधारण रक्षक.
कर्तव्यों का बोध कराती,
अधिकारों का ज्ञान.
शिक्षा से ही मिल सकता है,
सर्वोपरि सम्मान.
बुद्धिहीन को बुद्धि देती,
अज्ञानी को ज्ञान.
शिक्षा से ही बन सकता है,
भारत देश महान.
-Dr. Parshuram Shukla
शिक्षा
पढ़ना -लिखना सबको भाय,
जीवन बगिया यह महकाय.
अक्षर ज्ञान बड़ा अनमोल,
जगह -जगह तुम पीटो ढोल.
निरक्षर का न ठौर
ठिकाना, सहता वह तो, कष्ट नाना.
शिक्षा तो है अद्भुत होती,
लौ इसकी है तम भगाती.
– Ramprasad Sharma ‘prasad’
This comment has been removed by the author.
ReplyDelete