Type Here to Get Search Results !

12 जानेवारी राजमाता जिजाऊ माँ यांची जयंती आणि सूत्रसंचालन

राजमाता जिजाबाई भोसले ... एक आदर्श  









"जिजाऊ जयंती विशेष - नक्की वाचा"


© हि माहाती Pdf मध्ये डाऊनलोड करण्यासाठी ®

असं म्हणतात कि इतिहासाच्या पानांमध्ये हरखून न जाता येणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करावी, परंतु याच इतिहासात अशी काही सोनेरी पानं असतात जी न कि केवळ आपल्याला आपल्या चुकलेल्या मार्गाची जानिव करून देतात, येणाऱ्या भविष्याचा मार्गही त्याच्या दिव्यत्वाने उजाळून टाकतात.
आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची लेकरं या बाबतीत नशीबवानच ! कारण तसा वारसाच आम्हाला लाभला आहे, इतिहासातील प्रत्येल पण म्हणजे हिऱ्या - मानकांच्या शब्दांनी रचलेले निखळ सोनेरी पानं !
या मातीत थोर संत झाले , विचारवंत हि झाले ! इथेच वीर जन्माला आले, आणि इथेच आम्हाला हजारो वर्षांच्या निद्रेतून जागे केले ते समाजसुधारकांनी !
आज या इतिहासाची उजळणी करावी वाटली कारण आज १२ जानेवारी !
याच महान महाराष्ट्राच्या एका नव्या इतिहासाला जन्म देणाऱ्या माउलींची जयंती ! हरवलेल्या स्वाभिमान आणि अस्तित्वाला पुनरजन्म देणारी माता !
आपल्या पोटचा गोळा स्वराज्यास अर्पण करून या मातीला आपला पहिला छत्रपती राजा देणारी माता म्हणजेच राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांची जयंती.
अगदी कालपरवाच अखंड क्रांतीज्योती सावित्रीबाईंची हि जयंती पार पडली, कुठे कुठे या जयंत्या मोठ्या प्रमाणावर साजऱ्या हि होत असतील.
आजच्या या दिनी आम्हाला एक प्रश्न पडलाय कि ज्या इतिहासाचे दाखले देऊन आम्ही नवीन पिढी घडवण्याचे स्वप्न पाहतो निदान त्या इतिहासाने तरी
आमच्या या प्रेरणामुर्तींसोबत न्याय केलाय का?
जिजाऊ शिवाय शिवबा छत्रपती झाला असता ?ज्योतीराव कुणाच्या खांद्याला खांदा लाऊन स्त्री शिक्षणासाठी झगडले असते ? या थोर स्त्रीयान्शिवाय इतिहास हा इतिहास तरी झाला असता का ? शेवटी इतिहासाला जन्म द्यायला हि एक माउली च लागते हे हि आम्ही विसरलो ?
ज्या समाजात हजारो वर्षे स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, दुर्गा - शक्ती अशी उपमा तर देतात पण सर्वात जास्त अत्याचारहि तिच्यावरच होत असतात, मग अश्या समाजाला जिजाऊ - सावित्रीबाई सारख्या असामान्य महिलांची ओळख करून देण्यात हा इतिहास का कमी पडला ?




आज हि स्त्री हि दुय्यमच, मग ती दलिताची असो वा सवर्णा ची ! हिंदूंची असो व मुस्लिमांची ! तीच गुलामगिरी तोच अन्याय ! अगदी आमच्या घरा -घरापर्यत हि असमानता ! आज हि गर्भातच तिची हत्या !
मग हे धड धडीत सत्य समोर असतांना का इतिहासकार का कमी पडले ह्या असामान्य स्त्रियांचे संस्कार रुजवण्यात ! बर ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या पाठीशी समाज तरी उभा राहिला का ?
आजचा दिवस म्हणजे एक नवा इतिहास जन्माला घालणाऱ्या माउली चा जन्म दिवस !
इतिहास निर्माण करणे म्हणजे झालेल्या चुकांना सुधारून पुन्हा नवा इतिहास घडवणे … मग आजच्या या दिवशी करूया एक संकल्प….
स्त्रियांचे हिरावलेले हक्काचे स्थान त्यांना प्राप्त करून देण्याचा ! आमच्या माता - भगिनी आणि मुला-मुलींमध्ये जिजाऊ आणि सावित्री चे संस्कार रुजवण्याचा ! येणाऱ्या पिढीला जिजाऊ - सावित्री सारख्या स्त्रियांची खरी ओळख करून देण्याचा !
इतिहासातील हरवलेले हे सोनेरी पान समाजासमोर उघडे करण्याची आज खरी गरज आहे, खात्री आहे येणारा काळ त्यांच्या विचारांनी - संस्कारांनी उजाळून जाईल !
याची सुरुवात आपल्या घरापासून करा ! तुमच्या मुलीमध्ये जिजाऊ आणि सावित्री बघायला सुरुवात करा ! फ़क़्त तिलाच नवनिर्माणाचे सामर्थ्य आहे, त्यांच्या हातूनच या राष्ट्राचे नव - निर्माण घडू दे !!
पुन्हा एकदा राजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन !
जय जिजाऊ - जय शिवराय

सौजन्य :
आपलेच कार्यकर्ते,
जिजाऊ.कॉम
www.jijau.com


〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

राजमाता जिजाबाई

 जिजाऊ … जिजामाता … राजमाता जिजाबाई भोसले … मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री … अशा अनेक नावानी आपण यांना ओळखतो. ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत.          



  सिंदखेडचे पाच हजारी मनसबदार लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते. वाढत्या वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या.  पुढे डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.           




पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला. जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.           




 शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली होती. शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. दादोजी कोंडदेव व इतर कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगितल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मी ही - पारतंत्र्यात आहोत, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.         




     शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.          




 राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली. शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.    




    आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाऊ भोसले !!! - 




सौजन्य : 

http://www.baalpan.com/samajik/article-story/rajmata-jijau


〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

राजमाता जिजाऊ



जिजामाता (जन्म – १२ जानेवारी १५९८, : मृत्यू – १७ जून १६७४) ह्या मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाऊंचे वडील होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले. हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला . या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता
जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. जिजाबाईंना पहिले आपत्य झाले नाव काय ठेवायचे हा प्रश्न होता ६ महिन्यानंतर दीराचे नावा प्रमाणे संभाजी ठेवले. यानंतर त्यांना ४ मुले झाली चार ही दगावली,७ वर्षाचा काळ निघुन गेला. १९ फेब्रुवारी फाल्गुन वैद्य तृतीया सुर्यास्ताच्या वेळी शिवनेरीत जिजाऊंना मुलगा झाला. छत्रपती शिवाजीराजे भोसलेयांचा जन्म झाला. शिवनेरीत पाळणा बांधला नाव ठेवले “शिवाजी”. स्वतः च्या कर्तुत्वाने अगर थोर पती मिळाल्याने ज्यांचे आयुष्य कीर्तिमंत ठरले अशा नामवंत स्त्रीया पुष्कळ आहेत. पण मुलगा अत्यंत थोर व कर्तबगार निपजल्यामुळे जिच्या मातृत्वाची कीर्ती चहूकडे वर्षानुवर्ष गाजत राहिली अशी भाग्यवती एक राजमाता जिजाबाईच श्री. छत्रपतींची माता.
शिवाजी या लहानच, पण या क्षणापासून दोन उत्तम गुरु त्याला लाभले. एक दादाजी व दुसरा परमश्रेष्ठ गुरु प्रत्यक्ष माता जिजाबाई! माता जिजाबाईचं कर्तृव्य फार थोड म्हटलं पाहिजे शिवाजीच्या बालमनावर त्यांचे संस्कार घडी – घटकेला होत होते. हिऱ्याला पैलू पाडण्यासारखं हे जिजाऊंनी कठीण काम केलं महाभारत व रामायणातल्या आदर्श पुरुषांच्या शौर्याच्या व न्यायाच्या कथा ती मुलाला रोज सांगे, तर दुसऱ्या तऱ्येचे राजकारणाचे धडे, जहागीरीची व्यवस्था व शालेय शिक्षण यांची माहिती दादाजी कोंडदेव देत होते. शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली.कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगितल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता.
प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मी ही – पारतंत्र्यात आहोत, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले. शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली. राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज सोयरिक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते. यवनांचा उच्छेद करून आपण्याच मराठ्यांचे राज्य स्थापन करण्याचे विचार शिवरायांचा मनात घोळू लागले. माता जिजाऊच्या व माता जगदंबेच्या शुभशीर्वादाने शिवाजीने तोरणा गड घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे शिवबाने आजूबाजूचे किल्ले जिंकून घ्यायला सुरुवात केली. १६४६ सालापासून शिवाजीने चाकण,पुरंदर,रोहीडा, राजमाची अशी अनेक किल्ले घेतले आणि १९७४ साली शिवाजी छत्रपती झाले !
जिजाबाईंच्या आयुष्यातली एकच एक इच्छा ‘आपलं मराठयाचं स्वत्रंत्र राज्य व्हावं’ ही तिच्या अलौकिक पुत्रांनी पूर्ण केली. जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत. शहाजीराजेंच्या गैरहजेरीत त्यांनी दोन्ही भूमिका पार पाडल्या. या संस्कारांच्या जोरावरती छत्रपती शिवरायांनी हजारो वर्षांची गुलामगिरी मोडून काढली, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. पुत्राच्या कर्तृत्वावर वेळोवेळी मायेची, प्रोत्साहनाची, मार्गदर्शनाची फुंकर घालत त्याला राजसिंहासनावर अधिष्ठित झालेला बघेपर्यंत जिजाऊ लढत राहिल्या. राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली. शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.












सौजन्य : http://mh-marathi.com/jijamata/

〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मा साहेबांच्या जयंती निमित्त.....

अग्निरेखा.....!!
आज १२ जानेवारी सर्व मराठ्यांनी आपल्या मनात कोरून ठेवावा असा दिवस...महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटनी देणाऱ्या, सुराज्याची स्वप्न साकारणाऱ्या, स्वाभिमानी, जाधवांची कन्या तर भोसलेंची सून असलेल्या राजमाता जीजाऊंची जयंती.... ज्यांनी सर्व मराठ्यांच्या रक्तात स्वाभिमान भिनवला प्रत्येक  मावळ्यात शिवबा घडवला..ज्यांनी आपले उभे आयुष्य या स्वराज्याचा जडण घडनासाठी पणाला लावले.. वेळोवेळी पत्नी म्हणून धीराने शहाजी राज्यांच्या सोबत उभ्या राहिल्या..शिवरायांच्या मातृत्व बरोबरच गुरुत्वही स्वीकारले अशा कर्तुत्ववान “राजमाता जीजाऊ” मासाहेबांची जयंती.....
पित्याच्या शिलेदारीमुळे जन्मापासूनच दैवी आलेल्या असहाय भ्रमंतीचे चटके बसलेल्या, लग्नझाल्यावरही परत तीच दु:खद भ्रमंती वाट्याला आल्याने आणि ही भ्रमंती म्हणजे केवळ विषवृक्षाला खतपाणी घालण्याचा प्रकार आहे ही जाणीव झालेल्या जीजाऊंना अनंत तीबलेनी ‘अग्निरेखा’ म्हणून संबोधले आहे.. ‘अग्निरेखा’ जणू डीवचलेली नागीण,रौद्ररुप धारण केलेली आकाशाची चपला...जी क्षणातच सार ब्रम्हांड उजळून टाकते अशी अग्निरेखाच...!!! ती केवळ निमिषमात्रच चमकते पण सार ब्रम्हांड हादरवून टाकणारा आवाज करते, कसं घडलं याचा मागमूस ही न ठेवता जशी येते तशी निघूनही जाते...
राजमाता जिजाऊ ही अशाच पिता नी पती यांच्या सहवासात दरवेशाच निराधार जीवन जगल्या...पित्याची अमानुष हत्या पाहिली, पतीची अवहेलना उरत जतन करून ठेवली... पती हयात असताना परीत्यक्तेच जीवन वाट्याला येऊनही धीर सोडला नाही... आपण स्त्री आहोत, दुबळ्या आहोत असा विचारही स्पर्शु न दिलेल्या स्वभिमानी कन्या, कर्तुत्ववान पत्नी, देव-धर्म देशावर प्राणांहून अधिक प्रेम करणारी माता, बलवंत असूनही यावनी चाकरी करत पातशहाच्यासमोर गर्दन झुकावनाऱ्यांनची कीव न करणाऱ्या हिंदू स्त्री...
वीर संभाजी राजे आणि पिता, बंधू दत्ताजीच्या अकाली मृत्यूने दगलबाज यवनांना पुरत्या ओळखून चुकलेल्या मानी स्त्री...पातशाहीच्या काळात कर्तबगार वजीर म्हणून मिरवणाऱ्या, स्वैराचारी यवनांच्या  दुर्बलाने पेटलेल्या असतानाही धाडसाने मान वर करून पाहणाऱ्या.. आपल्या पुत्रात या स्वैराचारी यवनांच्या दगलबाजी विरुद्ध भावना ठेचून भरणाऱ्या आणि त्याला शस्त्र, अस्त्रविद्या, राजकारण समजावून सांगून बलवंत बनविणाऱ्या एक जिद्दी माता.....
‘अग्निरेखा’ मा जिजाऊ एक माता होत्या एका युगपुरूषाची पण केवळ माताच नाही तर कुणाची तरी  कन्या, पत्नीही होत्या..सर्व सामान्य स्त्रीला जी नातेसंबंध,बंधन असतात तशी सारी नाती त्यांनाही होती,  त्यांनी ती पत्कारली ही...पिता, बंधू, ज्येष्ठ चिरंजीव संभाजीच्या हत्येने विव्हळ बनल्या, पतीच्या अपमानाने चीडल्याही..पण हे सार असतानाही त्यांनी आपले कर्तव्य सोडले नाही जिद्द सोडलं नाही...
“माता ही खऱ्या अर्थाने एक शिल्पकार असते..तिने दिलेले बोध,ज्ञान हा कुठल्याही ग्रंथापेक्षा जास्त पवित्र,प्रभावशाली असते...आपल्या अपत्यांना घडविण्याच कर्तव्य तिला पार पडावच लागतं”.....
जीजाऊ साहेबांनी ही तसचं केल...जन्माला घालतानाच शिवरायांना आपलं सुन्दर रूप दिल..अगदी तसच त्याचं चरित्रही घडवलं....शस्त्रविद्या,अस्त्रविद्या,राजकारण आणि यावनांबदलचा द्वेश अगदी ठासून भरला..देव,धर्म, देशावर प्रेम करायला शिकवलं... जीजाऊंसाहेबांनी आपल्या सुसंस्काराने एक पातशाह बनविला जो सिंहासनावर बसण्याआधीच “राजे” म्हणून मान्यता पावला...असा बादशाह-“छत्रपती शिवराय”... शेवटी कित्येक वर्षाच्या संघर्षानंतर ३२ मन सोन्याचे सिंहासन रायगडी अवतरले आणि आपल्या “छत्रपती शिवराय” मिळाले ते या माऊलीमुळेच..त्यांच्या आशीर्वादानेच.....
शिवरायांच्या हातून त्यांनी एक नवा इतिहास घडविला.....नवा सुराज्य स्थापित केलं.....
हिंदू हिंदू म्हणून जगाला तो या अग्निरेखेच्या प्रकाशामुळेच..... अशा या “अग्निरेखा” राजमाता जिजाऊ साहेबांना त्यांच्या ह्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम...!!!
जय जिजाऊ !!
जय शिवराय !!
       राजमाता जिजाऊसाहेबांबद्दल लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न...जर काही चुकलं असेल तर क्षमा असावी...
- दिपीका.....
सौजन्य : http://vicharanchekshitij.blogspot.in/2012/10/blog-post.html
〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

राजमाता जिजाऊ


पूर्ण नाव - जिजाबाई शहाजीराजे भोसले
मृत्यू - १७ जून, इ.स. १६७४
पाचाड, रायगडचा पायथा
वडील - लखुजीराव जाधव
आई - म्हाळसाबाई

पती - शहाजीराजे भोसले

संतती - छत्रपती शिवाजीराजे भोसले

संभाजी - (संभाजीराजे भोसले या नावाच्या नातवाशी गल्लत नको)
राजघराणे - भोसले
चलन - होन

जिजाबाई (जिजामाता, राजमाता, जिजाऊ) (इ.स. १५९४- १७ जून, इ.स. १६७४) ह्या मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाऊंचे वडील होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी वेरुळ येथे विवाह झाला.
बालपण

राजे सिंदखेड वतनाचे (सध्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील) पाच हजारी मनसबदार लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते, पण वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या.

भोसले व जाधवांचे वैर

पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला, एकदा एक हत्ती पिसळला होता, हत्तीस पकडण्यास २ पथके तयार केली पहिले जाधवांचे त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाईचा भाऊ. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते. यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्‍यावर चालून आले यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला [ संदर्भ हवा ].

या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले [ संदर्भ हवा ]. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.

जिजाऊंची अपत्ये

जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.

जिजाबाईंना पहिले आपत्य झाले नाव काय ठेवायचे हा प्रश्न होता ६ महिन्यानंतर दीराचे नावा प्रमाणे संभाजी ठेवले. यानंतर त्यांना ४ मुले झाली ४रीही दगावली,७ वषाचा काळ निघुन गेला. १९ फेब्रुवरी फाल्गुन वैद्य तृतीया सुर्यास्ताच्या वेळी शिवनेरीत जिजाऊंना मुलगा झाला. छत्रपती शिवाजीराजे भोसलेयांचा जन्म झाला. शिवनेरीत पाळणा बांधला नाव ठेवले "शिवाजी".
राजांचे संगोपन आणि कुशल कारभार

शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. दादोजी कोंडदेव व इतर कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्‍यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादोजी कोंडदेव यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. माहेरात त्यान्च्यावर घडलेले सन्त एकनाथान्च्या वाङ्गमयाचे संस्कार त्यानी शिवबावर केले. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगीतल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. अशा प्रत्येक गोष्टीत त्यांनी पराक्रमी पुरुषाला भगवंताचे स्थान दिले, तर स्वातंत्र्याला ध्येयाचे स्थान दिले.

प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मीही - पारतंत्र्यात आहोत, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.राजांना घडवताना त्यांनी फक्त भावार्थ रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.

शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचं धाडस दिलं. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवलं. शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.
जीवन

शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली. सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.

राजांच्या प्रथम पत्नी, सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या. एवढच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज सोयरिक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.

राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली.

शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.

जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता होय.




सौजन्य : 
https://www.facebook.com/notes/521307837918836/



〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad