परिपाठ सूत्रसंचालन
"संस्कार शाळा आहे ज्ञानाची लाटइथेच मिळते यशाच्या शिखराची वाट, अशा या सुंदर शाळेत नेहमी सादर होतो परिपाठ.
म्हणून आज आम्ही इयत्ता......वी मुले/मुली परिपाठ सादर करणार आहोत तरी तुम्ही आमचा परिपाठ शांत चित्तेने एकून घ्यावा हि नम्र विनंती.
१)सुविचार:-
कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा.वाटेत खूप ससे आडवे येतील बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.आणि जर तुमची श्रीमंती तुम्हाला मोजायची असेल तर नोटा मोजू नका चुकून कधी डोळ्यातून दोन अश्रू आले तर ते पुसायला कितीजण येतात ते मोजा म्हणून कासवाच्या गतीनं का होईना थोडी थोडी प्रगती करा आणि प्रगती करण्यासाठी आपल्याकडं चांगले व सुंदर आचार विचार असणे गरजेचे आहे.म्हणून आजचा चांगला विचार म्हणजे सुविचार सांगण्यासाठी येत आहे......
२)दिनविशेष:-
नवीन दिवस नव्या उम्मेदी जरा शोधूया.नवीन वाटा प्रकाशाकडे वाटचाल अन अंधाराच्या थोपवू लाटा.खरच येणारा दिवस कालच्या पेक्षा अधिक आनंदाने,उत्साहाने आणि चांगल्या दृष्टीकोण जगायचा असतो आजचा दिवस हि असाच आहे.म्हणून आजच्या दिवसाचे महत्व दिनविशेषातून सांगण्यासाठी दिनविशेष घेऊन येत आहे......
३)बातम्या:-
मित्रहो असा प्रश्न पडत नाही का? कि बातम्यांना इंग्रजीमध्ये NEW,S असे का म्हणतात? कारण N-म्हणजे नॉर्थ,E-म्हणजे ईस्ट,W-म्हणजे वेस्ट व S-म्हणजे साऊथ अशा जगातील चार दिशातील कानाकोपऱ्यातील घडामोडी आपल्याला कळतात म्हणून त्याला NEW,S असे म्हणतात. म्हणून आजचे न्युज म्हणजे बातमीपत्र घेऊन येत आहे........
४)बोधकथा:-
खूप काही शिकून जाते जाता जाता म्हणून रोज ऐकायची असते एक छोटीशी बोधकथा म्हणून आजची बोध कथा सांगण्यासाठी येत आहे......
५) प्रश्न:-
प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ दे लाख चूका खरंच माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो.अन आयुष्यभर विद्यार्थी म्हटल्यावर प्रश्न हे पडणारच तसेच आम्हाला हि काही प्रश्न पडले आहेत बघूया तुम्हाला त्याची उत्तरे येतात का?म्हणून आजचे प्रश्न घेऊन येत आहे......
६)कोडे:-
छोट्या या आयुष्यात खूप काही हवं असतं पण पाहिजे तेच मिळत नसत.असंख्य चांदण्यांनी भरूनही आपलं आभाळ मात्र रिकामं असतं.हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात.पण नमिळणाऱ्या गोष्टीच का माणसाला हव्या असतात?म्हणून म्हणतात जीवन एक खेळ नव्हे,फुकट मिळालेला वेळ नव्हे जीवन एक कोडे आहे.सोडवला तितके थोडे आहे.म्हणून जीवनासारखे एक मजेदार कोडे घेऊन येत आहे.....
७)इंग्रजी संवाद:-
इंग्रजी भाषा हि आंतरराष्ट्रीय भाषा आहे.त्याचा पाया मजबूत होण्यासाठी शब्दार्था बरोबर छोटे छोटे संवाद येणे गरजेचे आहे म्हणून आजचा इंग्रजी संवाद घेऊन येत आहे.......
शेवटी जात जात एवढंच म्हणेन
"किती क्षणाच हे आयुष्य असतं
आज असतं तर उद्या नसतं
म्हणून ते हसत हसत जगायचं असतं .कारण येणारे दिवस येत असतात, जाणारे दिवस जात असतात,येणाऱ्यांना घडवायच असतं, जाणाऱ्यांना जपायच असतं
अन आयुष्याच गणित सोडवायच असतं, म्हणूनच कधीतरी कोणासाठी तरी जगायच असतं"
Nice aaj tumchya mule majha paripath chagla hoto thank you sir aani asacha navin sutrasanchalan parat gheun ya by
ReplyDeleteBHAI KOI DUSRA DIKHM
ReplyDeleteHindi paripath
ReplyDeleteNew sutrasanchalan
ReplyDelete