💃 गॅदरींग सूत्रसंचालन 👯
आपल्या भारतात कोणत्याही कार्यक्रमाचा प्रारंभ ईश्वर पूजनाने होतो. ईश स्तवनाने होतो..सर्व विद्यांची देवता म्हणजेच श्री गणेश..
त्याच्याच तर गीताने आपण आपल्या या स्नेहसंमेलनाचा प्रारंभ करूया...!
सनईच्या सूरात, ढोल-ताशांच्या निनादत आपणही रंगून जाऊया..
(इथे त्या गीताला प्रारंभ करावा व सुरूवातीचे म्युझिक लो आवाजात चालू असतांना खालील ओळी म्हणाव्यात.)
चला तर मग पाहूयात---- यांचा नृत्याविष्कार असलेलं -----हे गीत...!
-----------------
🌴 संत साहित्याच्या भव्य प्रासादात गवळण वाङमय हे एक श्रंगारलेले दालन होय.. यात शृंगाराच्या नाना परी आहेत. गोकुळातल्या गवळणी भक्तिने आसक्त झाल्या आहेत आणि यशोदामातेला गार्हाणी सांगू लागल्या आहेत..
मैया यशोदा हे गीत घेऊन येत आहेत-----
🌱 आपल्या राष्ट्राप्रती प्रत्येक नागरिकाचं प्रेम कसं असावं ? प्रत्येकांनी देशावर प्रेम करत करत कर्तव्य कशी पार पाडायची ? देशांचं रक्षण करणं हे फक्त सैनीकांचंच काम नसून ते तुमचं आमचं सर्वांचंच आहे. देशाचे रक्षण फक्त सैनिकच करू शकतात का ? आम्ही का नाही ? असा प्रश्न उपस्थित केलाय पहिलीच्या विद्यार्थ्यांनी...!
" आवो झुककर सलाम करे उनको ,
जिनके हिस्से में यह मुक्काम आता है ।
खूषनशिब होता है वो खून,
जो देश के काम आता है ।।"
(इथे विद्यार्थ्यांची नावे सांगून ) घेऊन येत आहेत न्हना मुन्ना राही हूँ , देश का सिपाही हूँ । हे गीत..
🌲 असावा सुंदर चाॅकलेटचा बंगला:- सांगा बरं मुलांनो , तुम्हाला काय आवडतं ? चला मीच सांगून टाकतो..
चाॅकलेट तुम्हाला खूप आवडतं ना ?
चिमणीचं घर मेणाचं ,
कावळ्याचं घर शेणाचं
अन् जर तुमचं घर चाॅकलेटचं झालं तर...
ऐकूया एक बालगीत.
सादर करित आहेत इयत्ता----- चे विद्यार्थी..
(इथे विद्यार्थ्यांची नावे सांगायची )
" उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,
नजरेत नेहमी नवी दिशा असावी...
घराचे काय कधीही बांधता येईल,
क्षितीजापलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी ।"
बघुया चाॅकलेटचा बंगला..
🌳 फेवीकाॅलसे:-
लोग अपना बनाकर छोड देते हैं ।
रिश्ता गहेरोंसे जोड लेते हैं ।
हम तो एक फुल भी ना तोड सके ।
लोग तो दिल भी तोड देते हैं ।।
इस टुटेवाले दिल को जोडने के लिऐ ----- लेकर आ राही है , दबंग-2 का एक बढीया एॅटम साँग- फेवीकाॅलसे.. फेवीकाॅलसे..
🌹गो-गो-गोविंदा:-
रंगांची उधळण, पाण्याचे फवारे ,
दहीहंडीची फोडाफोडी , त्यात नृत्याची धमाल..
या गीतात पहा प्रभुदेवासोबत गोविंदाच्या नृत्याची कमाल...
गोविंदा म्हटलं की तुम्हाला वाटलं असावं चित्रपटातला हिरो गोविंदा.. पण तसं नाही ? गोविंदा म्हणजे दहीहंडीवाला ...
सादर आहे 2012 मधलं सर्वात हिट गाणं.. गो-गो... गोविंदा ..ऽऽ....
ओ माय गाॅड... हे आहे चित्रपटाचं नाव.
सादर करत आहेत..
(आतमध्ये चालत चालत )
दहीहंडी फोडूया चला , गड्यांनो करूया गोपाळ काला,
आला आला रे गोविंदा आला रे...2
🎼 राधा ही बावरी :-
प्रेम म्हटलं की सर्वांच्या अंगावर कसे रोमांच उमटतात.. त्यात कृष्ण और राधा की बात म्हणजे आजरामर प्रितच...
' वात जळते प्रकाशासाठी ,
चंदन झिजते सुगंधासाठी ,
फुल हसते सुवासासाठी ,
सृष्टी फुलते दुसर्यासाठी..
कृष्णा प्रत्येकाला वाटते कुणीतरी झुरावे आपल्यासाठी ,
बावरी राधा जीवन जगते फक्त तुझ्याचसाठी ।
घेऊन येतेय नृत्याविष्कर..-----
👯 चला जेजुरीला जाऊ:- महाराष्ट्राचे अतिशय लोकप्रिय दैवत म्हणून खंडोबाची ख्याती आहे.. तो नवसाला पावतो अशी श्रद्धा भाविकात आहे. लोक नानाविध कारणांसाठी खंडोबाला नवस करतात.
आपणही त्या जेजुरीच्या खंडोबाला नवस करूया..
हे खंडोबा , महाराष्ट्रभर चांगलं पाऊस पडू दे.. लोक समाधानी राहु दे.. या कार्यक्रमाला खूप खूप गर्दी जमू दे..
आणि हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आनंदात पार पडू दे ।
एकदा तरी तुझ्या भेटीला येईन रे खंडोबा राया ।
सादर करित आहे ---- ही विद्यार्थीनी , चला जेजुरीला जाऊ ही लावणी..
चित्रपटाचं नाव आहे... नवरा माझा नवसाचा..
💃💃💐💐?🎹🎧🎤
अशा प्रकारे गॅदरींगचे निवेदन करता येईल..
व वेळोवेळी खालील उपमा अलंकारिक शब्दांची फोडणी देता येईल..
! माईंड ब्लोईंग परफाॅरमन्स..
! शिजली परफाॅरमन्स
! सुपर परफाॅरमन्स
! राॅकींग परफाॅरमन्स
! सुंदर परफाॅरमन्स
! अप्रतिम परफाॅरमन्स
! चड्डे-फड्डे परफाॅरमन्स
! तबला तोड परफाॅरमन्स
! ढोलकी फोड परफाॅरमन्स
! नयनरम्य अॅक्ट
! मनोहरी अॅक्ट
! अफलातून अॅक्ट
! प्राऊड ऑफ...
! एक से बढकर एक परफाॅरमन्स
इत्यादी.. इत्यादी..
आणि टाळ्यांसाठी वारंवार म्हणजे प्रत्येक गाण्यासाठी म्हटलं तरी चालेल..
👏🏼👏🏾👏👏🏿